नाशिकच्या सुप्रसिद्ध दसककर भगिनी शनिवारी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर 

0

नाशिक – शास्त्रीय संगीत, अभंग, फ्युजन आणि हार्मनी यांसारख्या वेगवेगळ्या व अनोख्या संगीत प्रकारांचे सादरीकरणाने जगभरात प्रसिद्ध असलेल्या नाशिकच्या सुप्रसिद्ध दसककर भगिनी अश्विनी, ईश्वरी, गौरी व सुरश्री यांचे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील ‘मैत्र हे शब्द ताल सुरांचे’ या कार्यक्रमात सादरीकरण होणार आहे.

सांगीतिक घराण्याच्या चौथ्या पिढीचे नेतृत्व करणाऱ्या दसककर भगिनी नेहमीच वेगवेगळ्या संगीत प्रकारांचे सुंदर प्रयोग करीत असतात. त्यांनी केलेल्या हार्मनी या वैविध्यपूर्ण प्रकारामुळे त्यांना जगभरात नवीन ओळख मिळाली आहे.

शास्त्रीय संगीत, अभंग, फ्युजन आणि हार्मनी यांसारख्या वेगवेगळ्या व अनोख्या संगीत प्रकारांचे सादरीकरण आणि त्या सोबत सांगीतिक गप्पा असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध तबला वादक सुजीत काळे साथसंगत करणार असून  हा कार्यक्रम शनिवार दिनांक २६ मार्च रोजी रात्री ८:३० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

Nashik's well-known Dasakkar sister on Doordarshan's Sahyadri channel on Saturday

पुनःप्रक्षेपण रविवार दिनांक २७ मार्च रोजी सकाळी १० व सायंकाळी ५ वाजता होणार आहे. संगीतप्रेमी रसिकांनी या कार्यक्रमाचा जरूर आस्वाद घ्यावा असे आवाहन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक सुभाष दसककर यांनी केले आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!