डाॅ.माेहन आगाशे,संजय पवार, गिरीश सहदेव यांना नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर

0

नाशिक –अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखेच्या वतीने एक वर्षाआड देण्यात येणाऱ्या पुरस्तकारांची घाेषणा करण्यात आली. २०२२ चे वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार संजय पवार, वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार डाॅ. माेहन आगाशे यांना तर बाबुराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार गिरीश सहदेव जाहीर झाल्याचे  परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी दिली.

अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने वि. वा. शिरवाडकर आणि  वसंत कानेटकर पुरस्कार १९९८ पासून दिले जातात. पंचवीस हाजार रुपये राेख, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तर शहरातील ज्येष्ठ नाट्यकर्मींसाठी सुरू करण्यात आलेला बाबुराव सावंत पुरस्कार २०१४ सालापासून दिले जातात. ११ हजार रुपये राेख, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कदम, ढगे यांच्यासह डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, शेफालीताई भुजबळ, रवींद्र ढवळे आणि  ईश्वर जगताप यांचा पुरस्कार निवड समितीत समावेश हाेता.

एकमताने निवड

पुरस्कार समितीच्या पाचही सदस्यांनी या दिग्गज नावांवर एकमताने शिक्कामाेर्तब केले. शासनाने दिलेले काेराेनाचे निर्बंध आता हळुहळू शिथील हाेत आहेत. त्यामुळे लवकरच पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या तारखा घेऊन त्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रा. रवींद्र कदम, अध्यक्ष, नाट्यपरिषद, नाशिक शाखा

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.