Navratri festival 2024:आजचा रंग नारंगी :पहा काय महत्व आहे नारंगी रंगाचे

0

नारंगी रंग उत्साह आणि चैतन्याचे प्रतीक आहे.देवी पार्वतीचे सातवे रुप म्हणजे कालरात्री किंवा काली माता.या देवीचा आवडीचा रंग नारंगी आहे.हा रंग बल आणि शक्तीचे प्रतीक आहे.

नारंगी रंग सुर्याशी निगडीत आहे.अंधार नाहीसा करणाऱ्या तेजाचा हा रंग. एखाद्या गोष्टीला आपण शारीरिक प्रतिसाद देतो.एखाद्या गोष्टीवर बुद्धीच्या बळावर मात करतो. पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण ‘गट फिलिंग’ने करतो. कधी कधी तिथे आपले तर्कशास्त्र, भावना बाजूला ठेवून काम करावे लागते. नारंगी रंग हा आपल्या या ‘आतून’ येणाऱ्या आवाजाला खतपाणी घालतो.

लाल आणि पिवळ्या रंगाच्या संयोगाने बनणारा नारंगी शक्ती, उत्साह आणि आरोग्य यांच्याशी संबंधित आहे. अतिशय पवित्र समजला जाणारा हा रंग. आपल्या आवडीनुसार घरातल्या कोणत्याही एका भिंतीला नारंगी रंगाने रंगवू शकतो.

भगवा किंवा नारंगी .शारीरिक ऊर्जेने परिपूर्ण असा लाल आणि डोक्याला चालना देणारा पिवळा यांच्या संयोगातून तयार झालेल्या या रंगामध्ये या दोन्ही रंगांचे सर्व चांगले गुणच सामावलेले आहेत. लाल रंगाची आक्रमकता आणि पिवळ्याचा चंचलपणा हे दोष भगवा मागे सोडून येतो. त्यामुळे तो लोकांना जास्त सुसह्य़ वाटतो.

पिवळ्याप्रमाणे हा पण एक उत्साहवर्धक रंग आहे. या रंगामुळे वातावरणात चैतन्य निर्माण होते. खरं तर हा रंग इतका आशावादी आहे की आपल्या रोजच्या जीवनात थोडय़ा प्रमाणात का होईना याचा वापर नक्की करावा. मग भलेही ती एखादी छोटीशी वस्तू का असेना! आपल्या जवळच्या या रंगाच्या अल्पशा अस्तित्वाने देखील मनाला टवटवी येते.

Pallavi Patil
पल्लवी पाटील (अभिनेत्री )

आजचा रंग – नारंगी
आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.