Navratri festival 2024:आजचा रंग गुलाबी:पहा काय महत्व आहे गुलाबी रंगाचे
आजचा रंग -गुलाबी आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा
आज नवरात्रीची आठवी माळ आज सप्तमी आणि अष्टमी एकाच दिवशी येणार आहे. आजचा रंग गुलाबी मानसशास्त्रीय दृष्ट्या, हा सकारात्मकतेचा, आशेचा, उबदार सेवा भावनेचा रंग आहे…. जीवनातं आश्वासन देणारा, आरोग्यदायी मानला जाणारा, सगळं काही ठिक होईल असा आशादर्शक आणि म्हणून PINK Cancer Care Organisation ची आश्वासक गुलाबी रिबीन….निसर्ग इंद्रधनुष्यासारखा आहे. रंग आपल्या भावना दर्शवतात. प्रत्येक रंगाचा सजीवांच्या मनाशी आणि शरीराशी खोल संबंध असतो, जसे लाल रंग ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक आहे. गुलाबी रंगाला जीवनात खूप महत्त्व आहे, हा रंग सौभाग्याचाही सूचक मानला जातो. आज आम्ही तुम्हाला ज्योतिष शास्त्रानुसार या रंगाचे फायदे सांगणार आहोत.
हा रंग देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे
हिंदू रितीरिवाजांनुसार, जेव्हा वधू लग्नानंतर पहिल्यांदा घरात प्रवेश करते तेव्हा तिच्या पायावर गुलाबी रंग लावला जातो कारण नवविवाहित वधूला लक्ष्मीचे रूप मानले जाते.
हा रंग घराच्या भिंतींमध्ये वापरला जातो
गुलाबी रंग हा प्रेमाचा सूचक आहे. वास्तुशास्त्रानुसार घराच्या भिंतींमध्ये गुलाबी रंग सकारात्मक वातावरण निर्माण करतो आणि कुटुंबात प्रेमही वाढवतो.
हा रंग थंडावा देतो
गुलाबी रंग थंडावा देतो असेही म्हटले जाते. वास्तुशास्त्रानुसार जिथे जिथे हा रंग असतो तिथे वातावरण थंड होते.
श्रीकृष्ण आणि राधा यांनाही हा रंग आवडतो
गुलाबी रंग प्रेमाचे प्रतीक आहे. जिथे हा रंग असतो तिथे आपोआप प्रेमाचा वर्षाव होतो. भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांना हा रंग आवडण्याचं कारण आहे.
मला हा स्त्री चा प्रेमातल्या निरपेक्ष समर्पणाचा रंग वाटतो… मग तिचं ते प्रेम प्रियाप्रती असेल नाहीतर आपल्या समाजसेवी कार्याप्रती…या सर्वांच्या मनावर या निरपेक्ष गुलाबी गुलालाची उधळण झालेली दिसते…
या चराचराप्रती, मानवतेप्रती असलेल्या या सर्वांच्या निखळ प्रेम भावनेचा हा गुलाबी रंग…या सर्व कोमल हृदयी आणि तरीही सशक्त शक्तीला त्रिवार वंदन….

आजचा रंग -गुलाबी
आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा