Navratri festival 2024:आजचा रंग लाल :पहा काय महत्व आहे लाल रंगाचे
आजचा रंग -लाल आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा
आजचा रंग -लाल
आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा
आज नवरात्रीची सहावी माळ आजचा रंग लाल हिंदू धर्मानुसार, लाल रंग उत्साह,सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे. लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे. हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील रंग आहे. हिंदू धर्मात विवाहित महिला लाल रंगाची साडी आणि हिरव्या बांगड्या घालते. निसर्गात लाल रंगाची फुले किंवा त्याच्या रंगसमूहाचे अधिक प्रकार आढळतात. देवी लक्ष्मीला लाल रंग आवडतो.मां लक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते आणि लाल कमळावर विराजित असते.
लाल रंग हा आपल्या वैयक्तिक ते व्यावसायिक आयुष्यापर्यंत असा मानवी आयुष्यावर सर्वात जास्त प्रभाव टाकणारा रंग आहे. रामभक्त हनुमानाला देखील लाल व शेंदुरी रंग प्रिय आहे. याच कारणामुळे भक्त हनुमानाला शेंदुर अर्पित करतात. माँ दुर्गाच्या मंदिरात आपल्याला लाल रंगाचा वापर अधिक दिसून येईल.लाल रंगासह केशरी देखील सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे.
सगळ्यात जास्त आकर्षक मानला गेलेला असा हा लाल रंग आहे. सर्वसामान्यांच्या कपड्यांपासून ते इंग्लंडच्या महाराणीच्या मुकुटापर्यंत सगळीकडे याला स्थान आहे. पाश्चिमात्य देशात लाल हा राजघराण्याचा रंग मानला जातो. हा रंग चिरंतन, सनातनी, पुनर्जन्माच्या संकल्पना सांगतो. लग्नात देखील लाल रंगाच वापर अधिक दिसून येतो.कारण हा रंग मांगळकि कार्यांत शुभ मानला जातो आणि आयुष्यातील प्रगतीशी संबंधित आहे.. भगवा रंग त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, राम, कृष्ण आणि अर्जुन यांच्या रथांचे ध्वज केशरी रंगाचे होते.केशरी रंग शौर्य,बलिदान आणि वीरता याचे प्रतीक आहे.सनातन धर्मात भगवे रंग त्या मुनी आणि संन्यासींनी घातला आहे,जो मुमुक्षु बनून मोक्ष मार्गावर चालण्याचा निर्धार करतात. असे संन्यासी स्वत:चं आणि त्यांच्या कुटूंबातील सदस्यांचे पिंडदान करुन सर्व प्रकारच्या आसक्तींचा त्याग करून आश्रमात राहतात.केशरी वस्त्रांना संयम,दृढनिश्चय आणि आत्म नियंत्रण यांचे प्रतीक मानले जाते.
लाल आणि या रंगाच्या इतर छटा मुलींच्या आवडत्या रंगांपैकी एक. जे लाल रंगाची निवड करतात ते अधिक आशादायी आणि कार्यक्षम असतात असं रंगाचं मानसशास्त्र सांगतं. वॉर्म कलर्स म्हणजे उष्ण रंगप्रकारामध्ये हा रंग येतो. उत्साह, क्रिया, इच्छाशक्ती याचा हा रंग प्रतीक आहे.तुमच्या माझ्या आणि यांच्याही धमन्यातून वाहणारे रक्त एकाचं रंगाचे… या स्त्रिया पण आपल्या समाजाचा एक अविभाज्य घटक आहेत ही जाणीव ठेवूयात…आज या आदिशक्तीचा जागर करताना तीच शक्ती या स्त्रियांमध्ये पण नांदत आहे याची आठवण करून त्यांच्या आस्तित्वाचाही आज जागर करुया आणि त्यांच्या कष्टांना माणूसकीचा नैवेद्य दाखवूया….