आजचा रंग हिरवा :पहा काय आहे हिरव्या रंगाचे महत्व
(आजचा रंग - हिरवा -आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा )
हिंदू दिनदर्शिकेनुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी ३ ऑक्टोबर पासून नवरात्री सुरू झाली.अश्विन महिन्यात शरद ऋतूची सुरुवात होते त्यामुळे याला शारदीय नवरात्री सुद्धा म्हणतात.
नवरात्रीच्या नऊ दिवसांना विशेष महत्त्व आहे. या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रुपांची आराधना केली जाते. नवरात्रीच्या या नऊ दिवसात सगळीकडे पुजापाठ, कार्यक्रम, स्पर्धा आयोजित केल्या जातात. सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. नऊ दिवस देवीच्या नावाने उपवास केला जातो.
आज ४ ऑक्टोबर २०२४ आज नवरात्रीचा दुसरा दिवस आजचा रंग हिरवा हिरवा रंग स्कंदमाता देवीचा आवडता रंग आहे हा रंग, सौभाग्य, प्रकृती, विकास यांचे प्रतिनिधीत्व करतो.नयनांना शांतवून सुखावणारा. सृजनाचं, नवोन्मेशाचं, समृद्धीचं प्रतीक असणारा. एकाच वेळी शांतवणारा आणि चेतना जागवणारा,आयुष्याच्या अस्तित्वाचा रंग आहे हा हिरवा… निसर्गात सर्वाधिक आढळणारा…
(आजचा रंग – हिरवा –आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email –jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा )
हिरवा रंग डोळ्यासाठी ही उत्तम आहे. हिरव्या रंगाच्या दर्शनाने डोळ्यांना शीतलता प्राप्त होत असते. सकाळी हिरवेगार वृक्ष, लतावेली किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने डोळ्यातील सूक्ष्म वाहिन्यांना शीतलता प्राप्त होते.
हिरवा रंग म्हणजे निसर्गाचा रंग. म्हणूनच शांतता आणि संतुलितपणाचा संगम तुम्हाला यात पाहायला मिळेल. तसेच हा रंग निर्मितीचा, आरोग्याचा आणि सकारात्मक ऊर्जेचा आहे असं म्हटलं जातं. इतर कोणत्याही रंगापेक्षा या रंगाच्या विविध छटा आपल्याला पाहायला मिळतात. हा रंग आपल्या मनालाही प्रसन्न करतो. म्हणूनच घराच्या सजावटीत हिरव्या रंगांचा वापर जास्तीत जास्त करायला काही हरकत नाही. हिरव्या रंगाने घरात प्रसन्नता निर्माण होत असते.
उद्याचा रंग – राखाडी