मुंबई,दि,२७ मार्च २०२४ -महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.प्रकाश आंबडेकर यांनी थेट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी केली आहे.वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपुरातील उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच,मनोज जरांगे त्यांच्या उमेदवारांबाबत ३० एप्रिलनंतर निर्णय घेतील असंही आंबेडकरांनी सांगितलं.
प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, नव्या आघाडीची घोषणा केली.पत्रकार परिषद घेऊन त्यांनी लोकसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आमची भूमिका ही ओबीसी समाजाला प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न होते.महाविकास आघाडीसोबत आघाडी करताना ओबीसी उमेदवार, मुस्लीम समाजाला प्रतिनिधीत्व देण्याबाबत आणि मनोज जरांगे फॅक्टर लक्षात घ्यावं,अशी भूमिका मांडली होती. वंचितनं आज आठ उमेदवार जाहीर केले आहेत.
वंचित बहुजन आघाडी सांगलीतून प्रकाश शेंडगे (ओबीसी बहुजन पार्टी) यांना उमेदवारी दिल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच,नागपुरात वंचित काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंना जाहीर पाठिंबा देणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. तसेच, राज्यातील सात जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे.तर,रामटेकमधील उमेदवाराचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होईल अशी माहितीही प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. प्रकाश आंबेडकरांनी एकूण ७ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये प्रामुख्यानं अकोला, भंडारा-गोंदिया,गडचिरोली,चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे.
वंचितची पहिली उमेदवार यादी जाहीर
भंडारा-गोंदिया : संजय केवट
गडचिरोली : हितेश पांडुरंग मडावी
चंद्रपूर : राजेश बेले
बुलडाणा : वसंतराव मगर
अकोला : प्रकाश आंबेडकर
अमरावती : प्राजक्ता पिल्लेवान
वर्धा : प्रा. राजेंद्र साळुंके
यवतमाळ-वाशिम : खेमसिंह पवार