किरण घायदार
नाशिक,दि,१२ नोव्हेंबर २०२४ –एसटी महामंडळाच्या मुख्य कार्यशाळेत एमस बॉडीच्या बस बांधणीचे काम सुरू होते. ही बस अर्ध्या पांढरा व अर्ध्या लाल रंगात तयार होत होती. या बस लेलँड कंपनीच्या चेसीसवर बांधण्यात येत होत्या.आता या बस टाटाच्या चेसीसवर बांधण्यात येत असून त्या पूर्ण लाल रंगातच राहणार असल्यामुळे लालपरीचा पांढरा रंग हद्दपार होणार आहे.
काही वर्षांपासून नवीन चेसीस उपलब्ध नसल्याने जुन्याच चेसीसवर बस बांधणी सुरू आहे.आतापर्यंत या चेसीस लिलँड कंपनीच्या होत्या.त्यावरील बस बांधणी थांबवण्यात आली असून आता चिखलठाणा (संभाजी नगर) येथील कार्यशाळेत टाटाच्या चेसीसवरच बसची बांधणी करण्यात येणार आहे. या चेसीस जुन्या जरी असल्या तरी त्या टाटाच्या वापरण्यात येत आहेत. दरम्यान,एमएस बॉडीची बस ही लाल आणि पांढऱ्या रंगात होती. आता ही बस पूर्णपणे लाल रंगातच असून प्रवाशांच्या काल हिचे आगमन नाशिक विभागात झाले आहे.
टाटाच्या चेसीसची फ्रेम मोठी लिलैंड कंपनीच्या चेसीस या लांबीला लास्त व रुंदीला कमी होत्या. तर टाटाच्या चेसीसची रुंदी जास्त आहे. या फरकांमुळे केवळ चाकांच्या दोन्ही अंतरात तफावत राहणार आहे.दोन्ही चेसीसमध्ये एवढाच काय तो फरक असला तरी केवळ टाटाच्या चेसीसवर बस बांधणी करण्याच्या सूचना आल्या आहेत.
नाशिक विभागात दाखल…
टाटाच्या चेसीसवरील बस बांधणी होऊन ती पूर्णपणे तयार होण्यास १२ ते १३ दिवसांचा कालावधी लागतो. यापूर्वी दोन ते चार दिवसांत एक बस बांधून पूर्ण होत होती. टाटाच्या चेसीसवर नुकतीच एक बस बांधणी पूर्ण झाली असून ती नाशिक आगारांत सेवेसाठी दाखल झाली आहे.