ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या ट्विट मुळे भाजपा कार्यकर्ते आक्रमक

0

पुणे,दि,९ फेबुवारी २०२४ –ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. पुण्यातील डेक्कन भागातील खंडोजी बाबा खोपडे चौकात त्यांच्या गाडीला भाजप कार्यकर्त्यांनी लक्ष्य केले. निखिल वागळे यांची गाडी पोलीस सुरक्षेत दांडेकर पुलानजीक असलेल्या राष्ट्र सेवा दल येथील नियोजित सभास्थळी जात होती.परंतु रस्त्यातच त्यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी गाडीवर दगडफेक करून शाईफेक केली.दगडफेकीत गाडीची समोरची आणि पाठीमागील काच फुटली.या घटनेनंतर कार्यकर्ते आक्रमक झाले. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या ट्विटनंतर भाजपने या कार्यक्रमास विरोध केला होता आणि या कार्यक्रमास पोलीसांनी देऊ नये अशी मागणी केली होती .मात्र पोलिसांनी या कार्यक्रमास सशर्त परवानगी दिलीय.या कार्यक्रमात आक्षेपार्ह भाषणे आणि वक्तव्यं करण्यात येऊ नये अशा सुचना कार्यक्रमाच्या आयोजकांना दिल्या.

सभेमध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे प्रमुख भाषण होते अॅड.असीम सरोदे आणि समाजवादी नेते नितीन वैद्य यांचीही भाषणे होणार आहेत.मात्र,वागळे यांची सभा झाली तर कायदा सुव्यवस्था बिघडेल, त्यामुळे त्यांची ही सभा होऊ देणार नाही,असा इशारा भाजपने दिला होता.

मात्र हल्ल्यानंतर निखिल वागळे सभास्थानी पोहचले.कार्यक्रमस्थळी परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी त्यांचे दणक्यात स्वागत केलं.निखिल वागळे यांची मंचावर एन्ट्री होताच फुले शाहू आंबेडकरांच्या गगनभेदी घोषणांनी सभास्थळ दणाणून गेलं.काहीही होऊ द्यात आपण सभा घेऊ,असा निर्धार वागळे यांनी बोलून दाखवल्यानंतर जमलेल्या गर्दीने घोषणा देऊन वागळे यांना तुफान प्रतिसाद दिला.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.