नवरंग :नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणत्या रंगाला आहे महत्त्व ?

आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email - jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा

0

आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email – jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप पाठवा

नाशिक दि, १३ ऑक्टोबर २०२३ – नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होतो यावर आधारित असतो.अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. धार्मिक ग्रथांनुसार, दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गाले आहे. शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत. नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान, सन्मान, धन-वैभव प्राप्त होऊ शकते. तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख, शांतता नांदते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. अनेक ठिकाणी दुर्गा पूजनासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे.

हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापने दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते. नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना करतात. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे.  यंदा नवरात्री सूर्यग्रहण आणि सर्वपित्री अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. तर २३ ऑक्टोबरपर्यंत नवरात्रीचा उत्साह असणार आहे.  या नऊ दिवसात घटस्थापनेसह गरबा दांडियाचा उत्साह नऊ दिवस रंगतो. या नऊ दिवसात नऊ रंगांचे कपडे परिधान केले जाता.
जाणून घेऊ या या वर्षी नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करायचा आहे.

प्रतिपदा- 15 ऑक्टोबर रविवार –  नवदुर्गा – केशरी, हा रंग सकारात्मक आणि उत्साहाचं प्रतीक आहे. 

द्वितीया- 16 ऑक्टोबरसोमवार – शैलपुत्री – पांढरा रंग, हा शुद्धता आणि पावित्र्याचं प्रतीक मानलं जातं. 

तृतीया – 17 ऑक्टोबरमंगळवार – ब्रह्मचारिणी देवी – लाल, हा रंग शुभ संकेत आणि ऊर्जेचे प्रतीक मानलं जातं. 

चतुर्थी – 18 ऑक्टोबर बुधवार – चंद्रघंटा देवी – निळा, हा रंग विशालता, विश्वास, श्रद्धा, आत्मियया यांचं प्रतीक मानलं जातं. 

पंचमी – 19 ऑक्टोबरगुरुवार – कृष्मांडा देवी – पिवळा, हा रंग प्रखरता, तेज आणि नव्या गोष्टीची सुरुवात म्हणून पाहिलं जातं. 

षष्ठी – 20 ऑक्टोबरशुक्रवार – स्कंदमाता – हिरवा, हा रंग निसर्गाचे आणि मायेचे प्रतीक आहे. 

सप्तमी- 21 ऑक्टोबर शनिवारी – कात्यायनी देवी – राखाडी, हा रंग स्थिरता, अढळता आणि शिस्तबद्धतेचं प्रतीक आहे. 

अष्टमी- 22 ऑक्टोबर रविवार – महागौरी – जांभळा, हा रंग महत्त्वाकांक्षा, ध्येय आणि उर्जेचे प्रतीक म्हणून ओळखलं जातं. 

नवमी – 23 ऑक्टोबर सोमवार – सिद्धीदात्री – मोरपंखी – हा रंग वाढ आणि सुपिकतेचं प्रतीक मानलं जातं. 
आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला खालील ई-मेल वर पोस्ट करा आम्ही आपले फोटो प्रसिद्ध करू आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला email – jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा योग्य छायाचित्रांना प्रसिद्धी देण्यात येईल (कृपया कॉल करू नये)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.