शिवसेना आणि धनुष्यबाणावर आज निर्णय नाहीच : आता २० तारखेला होणार सुनावणी

0

नवी दिल्ली, १६ जानेवारी २०२३ –धनुष्यबाण कुणाचे या प्रश्नाभोवती गेल्या चार महिन्यांपासून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये वाद शिगेला पोहोचला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला असून याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली.यावेळी दोन्ही गटाच्या वकिलानी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर निवडणूक आयोगाने सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली असून त्यानुसार आता शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरील पुढील सुनावणी शुक्रवार (दि.२०) रोजी घेण्यात येणार आहे.

धनुष्यबाण चिन्ह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे की बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला मिळणार या प्रकरणावर आज निवडणूक आयोगात सुनावणी झाली. यावेळी शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. तर शिंदे गटाकडूनही वकिलांची मोठी फौज युक्तिवादासाठी हजर होती.

‘शिंदे गटाने दाखल केली कागदपत्र ही जुनी आहे, महेश जेठमलानी यांनी केलेला दावा हा बोगस आहे. शिवसेनेमध्ये जी फूट पडली आहे त्याचा परिणाम पक्षावर होणार नाही त्यामुळे ही फूट ग्राह्य धरू नये. ही फूट काल्पनिक असू शकते. उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच ही खरी शिवसेना आहे. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत निर्णय घेऊ नये, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला होता.

तर, शिंदे गटाकडे पुरेसं संख्याबळ आहे. एखादा गट बाहेर पडला तर त्यात गैर काय आहे. आमदार, खासदारांची जास्त संख्या आमच्याकडे आहे. बहुसंख्येकडे नेणारी आकडेवारी महत्त्वाची आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा, असा युक्तिवाद जेठमलानी यांनी केला.

दरम्यान, शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाच्या याचिकेत त्रूटी असल्याचं सांगतानाच शिवसेना पक्षात फूट पडली नसून पक्ष पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचा युक्तीवाद केला आहे.कपील सिब्बल यांनी आज शिवसेनेची बाजू मांडताना यासंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रं सादर केली. त्यासोबत शिवसेनेतील फूट ही कपोलकल्पित असल्याचं सांगितलं. या फूटीचा पक्षावर कोणताही परिणाम झाला नसून शिवसेना पक्ष कायम असल्याचं त्यांनी सांगितलं.

शिंदे गटानं केलेल्या याचिकेनंतर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर हे प्रकरण आलं असून या याचिकेतील त्रूटी कपील सिब्बल यांनी आज आयोगासमोर मांडल्या. शिंदे गटाची फूट ही काल्पनिक असून त्याचा पक्षावर कोणताही परिणाम झाला नसल्याचा जोरदार दावाही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे पक्ष चिन्हाचा निर्णय देण्याची घाई करू नये, अशी विनंती कपील सिब्बल यांनी यावेळी केली. शिंदे गट बाहेर पडला असला तरी मूळ शिवसेना पक्ष हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचं त्यांनी सांगितलं.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा युक्तिवाद
तर, अद्याप कुणालाही अपात्र ठरवलं नाही. धनुष्यबाण कुणाचा हे ठरवण्यात अडथळा नाही. आमदार, खासदारांची आमच्याकडे जास्त संख्या आहे. बहुसंख्येकडे नेणारी आकडेवारी महत्त्वाची आहे. सर्व निकषांवर शिंदे गटच सरस आहे.  शिवसेनेची जुनी घटना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे केंद्रीत होती. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची घटना बदलली आहे.  उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख असे नाव स्वतःसाठी घेतलं मात्र ते शिवसेनाप्रमुख होत नाहीत बाळासाहेबांचे निधन झाल्यावर उद्धव यांनी स्वतःकडे अधिकार घेतले. शिवसेनेच्या घटनेत उद्धव यांनी केलेला बदल बोगस आणि बेकायदेशीर आहे, असा दावा शिंदे गटाने केला हो

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!