(NonVeg Chicken Rassa Recipe) रविवारचा दिवस म्हणजे खास जेवणाचा.(Sunday Special Recipe)आठवडाभराच्या धावपळीनंतर कुटुंब एकत्र येऊन रुचकर भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी रविवारची दुपार सर्वोत्तम असते. त्यात श्रावण महिना सुरु होणार आहे त्यामुळे नॉन व्हेज खाणाऱ्यांसाठी महिनाभर नॉनव्हेज बंद अशा वेळी झणझणीत आणि चविष्ट मसालेदार चिकन रस्सा ही एक उत्तम नॉनव्हेज रेसिपी आहे, जी सर्वांच्या जिभेवर लज्जतदार ठसा उमटवते.आजची रेसिपी खास जनस्थान च्या वाचकांसाठी खास शनिवारीच देत असतो म्हणजे गृहिणींना रविवारचे प्लॅनींग करणे सोपे जावे हा उद्देश आहे . खालील रेसिपी बनवा आणि आपला अनुभव कॉमेंट मध्ये शेअर करा .
साहित्य (४ जणांसाठी):(NonVeg Chicken Rassa Recipe)
गावठी चिकन – ५०० ग्रॅम (स्वच्छ धुतलेले)
कांदा – २ मोठे (सुतलेल्या फोडी)
टोमॅटो – २ मध्यम (बारीक चिरलेले)
आले-लसूण पेस्ट – २ चमचे
सुकं खोबरं – ४ चमचे
गरम मसाला – १ चमचा
धणे-जिरे पूड – २ चमचे
तिखट – २ चमचे (चवीनुसार)
हळद – १/२ चमचा
मीठ – चवीनुसार
तेल – ४-५ चमचे
पाणी – गरजेनुसार
कोथिंबीर – सजावटीसाठी
कृती:
सुकं खोबरं भाजून वाटण तयार करा:
प्रथम कढईत सुकं खोबरं हलकंसं खरपूस भाजा. त्यात थोडासा कांदा आणि थोडं तेल घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतावं. हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्या.
चिकन मसाला बनवणे:
कढईत तेल गरम करून त्यात कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतावं. नंतर त्यात आले-लसूण पेस्ट घालून वास निघेपर्यंत परतवा. त्यात टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत परता. आता हळद, तिखट, धणे-जिरे पूड घालून परतावं.
चिकन घालणे:
त्यात चिकनचे तुकडे घालून ५ ते ७ मिनिटं झाकण ठेवून परतवा. चिकनने थोडा रंग सोडल्यावर वाटलेलं खोबरं मसाला आणि गरम मसाला घालून परतावं.
रस्सा तयार करणे:
आता आवश्यकतेनुसार पाणी घालून चांगल्यानं ढवळा. झाकण ठेवून मध्यम आचेवर २०-२५ मिनिटं चिकन मऊ होईपर्यंत शिजवा. चव पाहून मीठ समायोजित करा.
सजावट आणि सर्व्हिंग:
वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. गरमागरम रस्सा भाकरी, तांदळाचा भात किंवा चपातीसोबत सर्व्ह करा.
टिप्स:
गावठी चिकन वापरल्यास चव अधिक उत्तम लागते, परंतु तुम्ही ब्रॉयलर चिकन वापरू शकता.
झणझणीत रस्सा हवा असेल, तर लाल तिखटात थोडं “बेडगी मिरची” पूड वापरा.
कांदा जास्त परतल्यास रस्स्याला गडद रंग आणि चव येते.
वाटप करताना लिंबाचा थोडासा रस आणि कांद्याच्या पात्यांची सजावट केल्यास लूक आणि टेस्ट दोन्ही वाढते.
दीपाली ओझरकर -राईकर ,नाशिक