आता २९ ऑगस्ट मुंबईला जायचं :मनोज जरांगेंची मोठी घोषणा

मराठा बांधवांनी २९ ऑगस्टच्या अगोदर सर्व काम आवरून ठेवा :आता माघारी यायचं नाही 

0

बीड ,दि,३० एप्रिल,२०२५ – मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना पुढच्या आमरण उपोषणाची तारीख जाहीर केली असून  २९ ऑगस्टला मुंबई धडक देऊन आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचा मनोज जरांगे-पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितला आहे. दोन वर्षे झाले तरीही आम्ही संयमाने घेत आहोत.मागील उपोषण सोडताना चार मागण्या तात्काळ अंमलबजावणी केले जाईल असे सांगितलं होतं. आज तीन महिने पूर्ण झाले, कुठल्याही मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही. आझाद मैदानावरती किंवा मंत्रालयाच्या समोर मी आमरण उपोषण करणार आहे, असं हि ते म्हणाले

ते पुढे म्हणाले, सरकारकडं मराठा बांधवांनी समजून घ्या कारणच नाही येत आता आपल्याला त्यामुळे मुंबई सोडायचा आता प्रश्न येत नाही, आंदोलनाची पुढील टप्प्याची रूपरेषा काय असेल ती आज मात्र आताच सांगणार नाही मराठा समाजाला माहिती मी जे पाऊल उचलेल ते तुमच्या हिताचा उचलतो. योग्य वेळी सांगितल्यावर तुम्हाला तेवढा एक महिन्याचा परत वेळ राहतोय. २९ ऑगस्टला मी उपोषण करणार तुम्ही सगळ्यांनी फक्त मला सोडायला आले तरी बास असंही पुढे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

मला समाजाच्या लेकराच्या अडीअडचणी बघाव्या लागतात, संयम तरी किती दिवस धरायचा. २९ ऑगस्ट २०२५ ला आम्ही मुंबईत जाणार आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. हे मुंबईत गेल्याशिवाय पर्याय निघत नाही हे आमच्या लक्षात आलं आहे.

मुंबईत आमरण उपोषण सुद्धा होणार आहे. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपल्याला त्या ताकतीने उठाव करावा लागणार आहे. सगळ्या मराठा बांधवांनी २९ ऑगस्टच्या अगोदर काम आवरून ठेवा. आता माघारी यायचं नाही, सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेला दीड वर्ष पूर्ण झाला आहे. पुढील आंदोलनाची दिशा एक ऑगस्ट रोजी सांगणार आहे.सरकारने आपली शंभर टक्के फसवणूक केली, असंही पुढे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

एक ऑगस्टला आंदोलनाची पुढील दिशा आणि मार्ग सांगणार आहोत. आजपासून तयारी सुरू करण्यात आलेली आहे. चलो मुंबई मला फक्त २८ तारखेला मुंबईत नेऊन सोडा. ज्यांना शक्य आहे त्यांनीच मला सोडायला या मी खंबीर आहे तुमच्या लेकरा बाळांसाठी लढायला. माझा समाज माझ्या मागे आहे. सात कोटी मराठा माझ्यासोबत आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!