आता बस मध्ये विमानाचा फील:एअर होस्टेसच्या धर्तीवर आता बस मध्ये ‘शिवनेरी सुंदरी’

एसटी महामंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

0

Navratri festival 2024
Navratri festival 2024

आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा

किरण घायदार 
नाशिक ,दि, १ ऑक्टोबर २०२४ –आता एस टी महामंडळाच्या बस मध्येप्रवाशांना विमानाचा फील मिळणार आहे.एअर होस्टेस च्या धर्तीवर आता एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’ नेमण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. एस. टी. महामंडळाची ३०४ व्या बैठक पार पडली. यावेळी अध्यक्ष भरत गोगावले यांनी या योजनेला मंजुरी दिली. पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार आहे. प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देण्याकरता `शिवनेरी सुंदरी’ नेमली जाणार असल्याची माहिती एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी सांगितले.

एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली, या बैठकीत खात्याच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून ७० पेक्षा अधिक विषयांवर चर्चा करुन त्यांना मान्यता देण्यात आली. त्यापैकी, मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी परिचारिका नेमण्यास मान्यता देण्यात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ एसटीच्या ३४३ बस स्थानकांवर ‘आनंद आरोग्य केंद्र’ या नावाने दवाखाना सुरू करण्यात येणार असून, अत्यंत माफक दरामध्ये बस स्थानकावरील प्रवाशां बरोबरच आसपासच्या सर्व नागरिकांना कमी दरामध्ये विविध आरोग्य चाचण्या आणि औषधे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित संस्थांना बसस्थानकांवरील ४०० ते ५०० चौ.सेमी. ची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तिथे त्या संस्थेने आरोग्य तपासणी दवाखाना, पॅथॉलॉजी लॅब आणि औषध दुकान सुरू करून सेवा द्यायची आहे.

तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील मूल व अमरावती जिल्ह्यातील धारणी या आदिवासी बहुल प्रदेशांमध्ये एसटीचे नवे आगार निर्माण करण्यात येणार असून, या आगाराच्या निर्मितीनंतर एसटीच्या एकूण आगारांची संख्या २५३ होणार आहे. तसेच एस. टी. महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर त्या परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विक्री करण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारुन१०X१० आकाराचा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उपरोक्त निर्णयाबरोबरच नवीन २५०० साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करणे तसेच १०० डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे.

विटा बसस्थानक पुर्नबांधणी कामाचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते भूमिपूजन
विटा येथील बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.  सुमारे १३ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या बसस्थानकामध्ये १८ फलाटाची निर्मिती करण्यात येणार असून सर्व बांधकाम हे आरसीसी स्वरूपात करण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये उपाहारगृह, दुकानगाळे, संरक्षित भिंत तसेच गेट त्याचबरोबर बसस्थानकाच्या अंतर्गत भागाचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या अद्ययावत बसस्थानकाच्या पुनर्बांधणीमुळे लोकांना अत्याधुनिक सोयी, सुविधायुक्त बसस्थानक मिळण्यास मदत होणार आहे.

यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, खासदार धैर्यशील माने, आमदार शहाजी बापू पाटील,  जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, मनपा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, माजी जि. प. सदस्य सुहास बाबर, अमोल बाबर,आनंदराव पवार प्रामुख्याने उपस्थित होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.