नवी दिल्ली – पेट्रोल-डिझेल , घरगुती गॅस सिलेंडर च्या दरवाढीनंतर आता रोजच्या जीवनात वापरात येणाऱ्या औषधांच्या किंमतीत देखील १ एप्रिल पासून वाढ होणार आहे.जवळपास ८०० औषधांचे दर १० टक्क्यांनी वाढणार आहेत. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं महाग होणार आहे. कोरोनाचा संकट आल्यापासून औषधांच्या किंमती वाढवाव्या अशी मागणी या औषध कंपन्या करत होत्या. अखेर एनपीपीएनं औषधांचे दर १०.७ टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली.औषधांच्या निर्मितीचा खर्चामध्ये ही प्रचंड वाढ झाली असून महागाई दरात वाढ झाल्यानं औषधांच्या किमती वाढवाव्या लागत असल्याचं एनपीपीए सांगितलं आहे.
जे ८०० औषधे वाढणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने ताप, हृदयविकार, उच्च रक्तदाब, त्वचा रोग आणि अशक्तपणा यावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्या औषधांचा समावेश आहे. याचाच परिणाम म्हणून पुढील महिन्यापासून म्हणजेच येत्या १ एप्रिल पासून पेन किलर आणि पॅरासिटामॉलसारख्या अँटीबायोटिक्स, फेनिटोइन सोडियम, मेट्रोनिडाझोल यांसारखी अत्यावश्यक औषधे महाग होणार आहे.
सरकारने शेड्युल औषधांच्या किमतीत १० टक्के वाढ करण्याची परवानगी दिली. औषधाच्या किंमती वाढल्याचा परिणाम हा प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबावर होईल याची शक्यता नाकारता येत नाही