आता शरीरावरील जखमा लवकर बऱ्या होणार ! शास्त्रज्ञांचं नवं संशोधन
शरीरात नव्याने पेशी निर्माण करणारा'सेल्यूलर ग्लू'
नवी दिल्ली – आता शरीरावरील जखमा लवकर बऱ्या होणारआहेत शास्त्रज्ञांनी एक नव्या प्रकारचा ग्लू म्हणजे गोंदचा शोध लावल्याचा दावा केला आहे. हा ग्लू मानवी शरीरातील जखमा लवकर भरण्यासाठी मदत करतो, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.१२ डिसेंबर २०२२ रोजी प्रकाशित झालेल्या नेचर अंकात प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात, संशोधकांनी या सेल्यूलर ग्लू संबंधित दावा केला आहे.
त्यामुळे तुम्ही आतापर्यंत बॉलिवुड किंवा हॉलिवुडच्या चित्रपटांमध्ये पाहिले असेल की, एखाद्या जखमेवर जादुई मलम लावल्यावर जखम झटपट बरी होते. हे आता खऱ्या आयुष्यातही शक्य होण्याचा मार्ग वैज्ञानिकांनी शोधला आहे.शास्त्रज्ञांनी मानवी शरीरातील जखमा लवकर बऱ्या करण्यासाठी नवीन संशोधन केले आहे. शास्त्रज्ञांनी एक नव्या प्रकारचा ग्लू म्हणजे गोंदचा शोध लावला आहे. हा ग्लू मानवी शरीरातील जखमा लवकर भरण्यासाठी मदत करतो, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.
सॅन फ्रान्सिस्को विद्यापीठातील संशोधकांनी हा नवीन शोध लावला आहे. शास्त्रज्ञांनी सेल्यूलर ग्लू तयार केला आहे. संशोधकांच्या मते, या ग्लूमुळे मानवी शरीरातील जखमा लवकर बऱ्या होतील. सॅन फ्रान्सिस्कोम विद्यापीठातील संशोधकांनी काही रेणू तयार केले आहेत. हे रेणू मानवी शरीरात एखादा ग्लू म्हणजे गोंदप्रमाणे काम करतात. या ग्लूमुळे मानवी शरीरातील पेशी जोडण्यात मदत होते. इतकंच नाही तर हे रेणू मानवी शरीरात नव्याने टिश्यू तयार करतात. ऊती म्हणजे पेशींचा समूह.
सॅन फ्रान्सिस्को विद्यापीठाच्या संशोधनाचा सविस्तर अहवाल येथे वाचा.
मानवी शरीरावरील जखमा लवकर भरुन काढणारा ‘सेल्यूलर ग्लू’
UCSF संशोधकांनी या तयार केलेल्या रेणूचं म्हणजे सेल्यूलर ग्लूचे पहिल्यांचा प्रात्यक्षिक केले. यामध्ये असे आढळून आले की, या शास्त्रज्ञांनी तयार केलेला सेल्यूलर ग्लू म्हणजे हे रेणू मानवी शरीरातील पेशींची जोडणी करण्यात आणि नव्याने ऊती तयार करण्यास मदत करतात, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. हा सेल्यूलर ग्लू मानवी शरीरातील क्षतिग्रस्त पेशींचे नुकसान भरून काढण्यास मदत करतो, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. हे नवीन संशोधन मानवी शरीर, अवयवांची पुर्ननिर्मिती आणि पुनरुत्पादक औषध यांच्याबाबतच्या संशोधनातील एक महत्त्वाचं आणि मोठं पाऊल आहे.
शरीरात नव्याने पेशी निर्माण करणारं संशोधन
१२ डिसेंबर २०२२ रोजी प्रकाशित झालेल्या नेचर अंकात प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात, संशोधकांनी या सेल्यूलर ग्लू संबंधित दावा केला आहे. शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, त्यांनी संशोधनात बहुसेल्युलर रेणू तयार केले आहेत. शास्त्रज्ञांनी विशिष्ट रेणू असलेल्या पेशी तयार केल्या आहेत. हे रेणू शरीरातील जखमी भरून काढतात आणि नव्याने पेशींची निर्मिती करतात, असाही दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.