आता शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार – उद्धव ठाकरे
विश्वासघातक्यांना जनतेच्या अश्रूंची किंमत चुकवायला लावू:मनपा निवडणुका लवकर घ्या; ऑगस्टमध्ये महाराष्ट्र दौरा करणार - उद्धव ठाकरे
मुंबई – महाविकास आघाडीसोबतचा प्रयोग फसला आहे, असंही बोललं जात आहे.शिवसेनेतून ४० आमदार आमदार आणि १२खासदार फुटल्यानंतर आता शिवसेनेचं कसं होणार? शिवसेना टिकणार की संपणार असे प्रश्न सातत्याने विचारले जात आहेत. एवढी मोठी फूट पडल्यानंतर आता भविष्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार का ?मात्र, या सर्व प्रश्नाला खुद्द माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या दुसऱ्या मुलाखतीत उत्तर दिले आहे. विधानसभा निवडणुका होऊ द्या, शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवतो,आता शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आहे.तसेच महाविकास आघाडीचा प्रयोग फसला नाही. लोकांनी या प्रयोगाचं स्वागतच केलं आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपले सडेतोड विचार मांडले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार तोंडसुख घेतलं आहे.
”मी वर्षा सोडून जाताना महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी होते. या अश्रूंचे मोल मला आहे. जनतेच्या अश्रूंची किंमत या विश्वासघातक्यांना चुकवायला लावल्याशिवाय आपल्याला गप्प बसता येणार नाही, गप्प बसू नका असा घणाघात शिंदे गटावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईकर महापालिका निवडणुकीची वाट बघत आहेत. या निवडणुका लवकर घ्याव्यात. ऑगस्टमध्ये मी महाराष्ट्र दौरा करणार आहे असेही ते म्हणाले.
मला शिवसेना वाढवायची आहे. शिवेसना वाढवण्याचा प्रयत्न मी सोडणार असेल तर माझ्या शिवसेना पक्षप्रमुखपदाला काय अर्थ? असा सवाल त्यांनी केला. सध्या शिवसैनिकांकडूनच शिवसेना संपवली जात आहे. पण जे गेले ते शिवसैनिक नाहीत हे लक्षात घ्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे आमचं म्हणणं ऐकून घेत नव्हते. आमच्या समस्या सोडवल्या जात नव्हत्या, असा दावा बंडखोर आमदारांनी केला आहे. त्यालाही उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. मी सर्व आमदारांच्या बैठका सुरू केल्या होत्या. आमदार आणि प्रशासानाच्या अधिकाऱ्यांना बसवून या मुलाखती होत होत्या. कुणाचं काम कुठं अडलंय हे मी स्वत: पाहत होतो. विचारत होतो. तिथल्या तिथे सूचना आणि आदेश दिले जात होते. काही अडलंय का हे सुद्धा आमदारांना विचारत होतो. तेव्हा साहेब, काहीच राहिलं नाही. सर्व कामे झाली असं आमदार सांगत होते. आता तुम्ही आम्हाला जसे भेटलात तसे भेटत राहा. आम्हाला काही नको, असं आमदार सांगत होते. आता मात्र आरोप करत आहेत. त्यांनी माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलावं. बोलण्याची हिंमत दाखवा, असं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी केलं.
शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन असं वचन मी बाळासाहेबांना दिलं होतं. ते वचन अजूनही अर्धवट आहे. कारण मी मुख्यमंत्री होईल असं म्हणालो नव्हतो. एक आव्हान म्हणून मला हे पद स्वीकारावं लागलं. ठरलेल्या गोष्टी भाजपने नाकारल्या. त्यामुळे मला ते स्वीकारावं लागलं, असं त्यांनी सांगितलं.
महापालिकेच्या निवडणुका लवकर घ्या
ठाकरे म्हणाले, महापालिका निवडणुका लवकर घ्यायला हव्या त्या का लवकर घेऊ नये. लांबणीवर टाकता कामा नये. तमाम मुंबईकर निवडणुकांची वाट बघत आहेत.म्हणून
ऑगस्टमध्ये दौरा करणार
उद्धव ठाकरे म्हणाले, आदित्य ठाकरेंचे दौरे महाराष्ट्रात होत आहेत. राज्यात मी फिरेल तेव्हा सर्व नेते माझ्यासोबत फिरणार आहेत, त्यांना काम देण्यासाठी मला वेळ लागणार आहे त्यासाठीच मी आताऐवजी ऑगस्टमध्ये दौरा करणार आहे.