नृत्यांगण कथक नृत्यसंस्थेचा २५ आणि २६ ऑगस्टला दोन दिवसीय ‘आवर्तन’ महोत्सव
नाशिककर अनुभवणार ताल, लय, अभिनय आणि पदन्यासाचा सुरेख संगम
नाशिक – कोविडच्या दोन वर्षांच्या सक्तीच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा नाशिकच्या नृत्यांगण कथक नृत्य संस्थेचा दोन दिवसीय आवर्तन महोत्सव उत्साहात पार पडणार आहे. येत्या गुरुवारी (दि.२५ ऑगस्ट) आणि शुक्रवारी (दि.२६ ऑगस्ट) संध्याकाळी सहा वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना गुरू कीर्ती भवाळकर आणि त्यांच्या शिष्या कथक सम्राट पं. बिरजू महाराजजींना आदरांजली म्हणून “नमन” ही कथकनृत्यप्रस्तुती सादर करणार आहेत. मागच्या काही वर्षात पं बिरजू महाराजजींकडून जे काही कथक नृत्याचे धडे मिळाले , जे मार्गदर्शन लाभले त्यातून त्यांना ‘नमन’ करण्यात येणार आहे. त्यांनी शब्दबद्ध, संगीतबद्ध आणि नृत्यदिग्दर्शित केलेल्या रचना कीर्ती भवाळकर आणि त्यांच्या शिष्या प्रस्तुत करणार आहेत. नाशिकच्या मधुरा बेळे, ज्ञानेश्वर कासार, पुष्कराज भागवत, रसिका नातू देसाई, अमृता जाधव जोशी या सुप्रसिद्ध गायकांनी गायल्या आहेत. तसेच तबल्याची साथ कल्याण पांडे, वैष्णवी भडकमकर, आणि अनिल धुमाळ यांनी ( सिंथेसायझर ) साथ केली आहे.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना सायली मोहाडकर आणि त्यांच्या शिष्या ‘कथकानुभव’ ही नृत्यप्रस्तुती सादर करणार आहेत. कथकच्या पारंपरिक वस्तुक्रमानुसार थाट, तोडे, चक्रदार तोडे, परन, तिहाइ, ततकार, अभिनय हे विद्यार्थिनी सादर करणार आहेत. गायन व संवादिनीची साथ पुष्कराज भागवत आणि तबल्याची साथ वैष्णवी भडकमकर करणार आहेत. ताल, लय, अभिनय आणि पदन्यासाचा सुरेख संगम दोन दिवस नाशिककरांना अनुभवता येणार आहे.
[…] अभंगांवर आधारित एक आगळावेगळा नृत्याविष्कार “आदी अनंत विठ्ठला” या नावाने […]
[…] कथक गुरू डॉ. सुमुखी अथनी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित […]