सर्वसामान्यांना उपनगरीय रेल्वे प्रवास करता यावा यासाठी आज (दिनांक ११ ऑगस्ट २०२१ ) रोजी सकाळी ७ वाजेपासून उपनगरीय रेल्वे स्थानकांवर सुरु होणार कोविड लसीकरण ऑफलाईन पडताळणी व मासिक रेल्वे पास प्रक्रिया
• नागरिकांनी पडताळणीसाठी येताना कोविड लसीकरण दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र व छायाचित्र ओळखपत्र पुरावा आणणे आवश्यक
• पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्यांना दिनांक १५ ऑगस्टपासून प्रवासाची मुभा मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ५३ रेल्वे स्थानकांवर ३५८ मदत कक्ष उघडणार . संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात एकूण १०९ स्थानकांवर मदत कक्ष
• सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत सलग दोन सत्रांमध्ये कक्ष राहणार कार्यरत
• घरानजीकच्या स्थानकांवर पडताळणीसाठी जावे, मात्र विनाकारण गर्दी करु नये बनावट कोविड प्रमाणपत्र आढळल्यास होणार कठोर पोलीस कार्यवाही
मुंबई – मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना दिनांक १५ ऑगस्ट २०२१ पासून उपनगरीय रेल्वे प्रवास करण्यास मुभा देण्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यानुसार, नागरिकांना लोकल रेल्वे प्रवास करणे सोयीचे व्हावे, त्यांना मासिक रेल्वे प्रवास पास मिळावा, यासाठी कोविड लसीकरण पूर्ण झाल्याची ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया आज ( दि ११ ऑगस्ट २०२१) पासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकूण ५३ रेल्वे स्थानकांवर तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर रिजन) १०९ स्थानकांवर सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत सलग दोन सत्रांमध्ये सुरु होणार आहे. त्याआधारे नागरिकांना मासिक रेल्वे प्रवास पास रेल्वेकडून देण्यात येईल, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.
याअनुषंगाने तपशिलवार माहिती देताना श्री. चहल यांनी सांगितले की, ज्यांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही मात्रा घेतल्या आहेत, त्यांना मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी सातत्याने मागणी होत होती. त्याची दखल घेवून राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सकारात्मक निर्णय जाहीर केला आहे. कोविड लसीकरण पूर्ण झालेल्या
पात्र नागरिकांना दिनांक १५ ऑगस्ट २०२१ पासून लोकल रेल्वे प्रवास करता येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी केली आहे.
त्यासाठी ऑनलाईन ऍपद्वारे तसेच ऑफलाईन अशा दोन्ही रितीने सुविधा पुरवली जाणार आहे. ऍप तयार करुन ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्याची कार्यवाह काही कालावधीत सुरु होईल. तत्पूर्वी आज पासून ऑफलाईन प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे, जेणेकरून सर्वसामान्य मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होवू नये, असे श्री. चहल यांनी नमूद केले. रेल्वे मासिक प्रवास पास देण्याची ही ऑफलाईन प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत आणि आठवड्यातील सर्व दिवशी निरंतर सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये, असे आवाहन करून ही रेल्वे पास देण्याची ही प्रक्रिया नेमकी कशी असेल, त्याबाबत बोलताना श्री. चहल यांनी पुढीलप्रमाणे मुद्देसूद माहिती दिली आहे.
Maharashtra | BMC begins issuance of local train passes to fully vaccinated people for whom services begin on August 15. Visuals from Dadar station, Mumbai.
"We're verifying vaccination certificates of people administered both doses & issuing them QR codes," says Anil Kate, BMC pic.twitter.com/u7d69QtFx0
— ANI (@ANI) August 11, 2021