शनिवार २९ एप्रिलला संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

0

नाशिक, दि. २६ एप्रिल २०२३ – नाशिक मनपाचे गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील १३२ केव्ही सातपूर व महिंद्रा या दोन फिडरवरुन ३३ केव्ही एचटी वीज पुरवठा घेण्यात आलेला आहे. सदर पंपिंग स्टेशन द्वारे मनपाचे बारा बंगला, शिवाजीनगर, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर व नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र यांना रॉ वॉटरचा पुरवठा करण्यात येतो.

महावितरण कंपनीकडून ओव्हरहेड लाईनची दुरुस्ती व पावसाळा पूर्व कामे (सातपूर कॉलनी ते कार्बन नाका ते गंगापूर धरण ) करण्या करीता तसेच मनपाचे मुकणे रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील रेमण्ड कार्यान्वित सबस्टेशन गोंदे येथून एक्सप्रेस फिडरवरुन जॅकवेलसाठी ३३ केव्ही वीजपुरवठा आहे. सदरचे महावितरण कंपनीच्या रेमण्ड सबस्टेशनमध्ये महावितरण कंपनीस सबस्टेशन मधील दुरुस्ती कामे करण्यात येणार आहे त्यामुळे वीजपुरवठा बंद राहणार आहे.

या सर्वकामा मुळे शनिवार दि. २९ एप्रिल २०२३ रोजी संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद राहील. तसेच दि. ३० एप्रिल २०२३ रविवार रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने कमी प्रमाणात होईल तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन मनपास सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!