श्री रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त राज्यात २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुटी जाहीर

0

मुंबई,दि.२० जानेवारी २०२३-श्री रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त राज्य सरकारने येत्या सोमवारी ,दि.२२ जानेवारी २०२४ रोजी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. याबाबतची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केली आहे.

श्री रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा सोहळा देशभरात उत्साहात साजरा केला जाणार आहे. सोहळा सर्वांना पाहाता यावा यासाठी २२ जानेवारीाल महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने २२ जानेवारीला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. सोमवारी म्हणजे २२ जानेवारीला सरकारी आणि खाजगी कार्यालयं, शाळा-कॉलेजला सुट्टी असेल. अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे राज्यात सु्टटी जाहीर करण्याची मागणी केली होती.

आमदार सत्यजीत तांबे, आमदार राम कदम यांच्यासह अनेक नेत्यांनी २२ जानेवारीला रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना पत्रही लिहिण्यात आलं होतं. सर्व शासकीय, निम-शासकीय कार्यालयं; शाळा, कॉलेज यांना सुट्टी जाहीर करावी अशी विनंती यात करण्यात आली होती.२२ जानेवारीला अनेक लोक रस्त्यावर उरतलील, ज्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते. महाराष्ट्र सरकारने यासंबंधी निर्णय घेतला नव्हता. पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना सणाप्रमाणे हा दिवस साजरा करा असं आवाहन केलं आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!