नाशिक,२८ सप्टेंबर २०२२ – तिसऱ्या माळेला २५ ते ३० हजार भाविकांनी घेतले सप्तशृंगीमातेचे दर्शन घेतले .देवीच्या तिसऱ्या शक्तीचे नाव चंद्रघंटा आहे. देवी चंद्रघंटाचे रूप परम शांतीपूर्ण आणि परोपकारी आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीचे तिसरे रूप असलेल्या देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते. देवी चंद्रघंटाची पूजा-अर्चा केल्याने आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते, असे मानले जाते. धार्मिक शास्त्रानुसार नवरात्रीच्या तिसर्या् दिवशी जो कोणी देवीचे तिसरे रूप असलेल्या चंद्रघंटाची पूजा करतो, त्याला देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो. यावर्षी 28 सप्टेंबर हा शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस आहे.
धर्म ग्रंथानुसार देवी चंद्रघंटाने राक्षसांना मारण्यासाठी अवतार घेतला होता. यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांच्या शक्तींचा समावेश होतो. त्या नुसार साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे नवरात्रोत्सवातील तिसऱ्या माळेची पूजा कळवणचे तहसीलदार तथा सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त श्री बंडू कापसे व विश्वस्त श्री भूषणराज तळेकर यांच्या हस्ते सपत्नीक श्री भगवती सप्तशृंगी देवीची पंचामृत महापूजा संपन्न झाली. यावेळी ना.डॉ.निलम गोऱ्हे उप सभापती महाराष्ट्र विधानपरिषद, श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त अॅड. श्री. दिपक पाटोदकर व महामंडळेश्वर स्वामी सविधानंद सरस्वती यांनी आई सप्तशृंगीचे दर्शन घेतले. याप्रसंगी. विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यकारी अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सुरक्षा विभाग प्रमुख यशवंत देशमुख यांसह सर्व ट्रस्ट कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थ तथा भाविक उपस्थित होते.
नवरात्रोत्सव यंदा दि. २६ ते दि.५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत आहे. सकाळी कमी असलेल्या भाविकांची गर्दी दुपारी वाढत गेली. पायी पायरीने व फनिक्युलर ट्रॉलीने भाविक दर्शनासाठी जात होते. पायरी चढत दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी पहिल्या पायरीजवळ नारळ फोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पायी पायरी चढत चढत आई सप्तशृंगीचा जय घोश करत भाविक भक्त मोठ्या उत्साहात आई सप्तशृंगी देवीचा मंदिराच्या पाहिऱ्या चढत होते यावेळी येणाऱ्या भाविकांना आई सप्तशृंगीचे नवीन तेजोमय स्वरूप पाहण्याची ओढ दिसून येत होती व मंदिरात गेल्यानंतर आई सप्तशृंगीचे मनमोहक स्वरुप पाहून भाविकांनी श्री भगवतीला आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी साकडे घातले. सुमारे २५ ते ३० हजार भाविकांनी सप्तशृंगी गडावर आई सप्तशृंगीचे दर्शन घेतले.