मुंबई,दि.२५ सप्टेंबर २०२३ –-गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.परंतु अचानक आलेल्या पावसामुळं शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. सणासुदीच्या काळात भाज्यांची आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांचे दर २० ते ३० टक्क्यांनी वाढल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात आली आहे.बाजारात भाजीपाल्यांचे दर वाढल्याने ऐन गणेशोत्सवात सामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागण्याची शक्यता आहे.
भाजीपाल्यांचे दर वाढल्याने आता सामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार असून गृहिणींचं आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या शहरातील बाजारांमध्ये भाजीपाल्यांचे दर कडाकले आहे. पालेभाज्या, कांदा, बटाटा आणि टोमॅटोच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे.
कांदा, बटाटे, टॉमॅटो आणि पालेभाज्या बाजारात पोहचत नसल्याने या पदार्थांचा तुटवडा निर्माण होत आहे. आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांचे दर २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुण्यासह नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये दररोज केवळ ६० ते ७० कांद्यांच्या गाड्या येत आहे. तसेच भाजीपाल्यांची आवकही झपाट्याने कमी होत असल्याचं चित्र आहे.