रेल्वे प्रवाशांसाठी मोठी अपडेट! १ ऑक्टोबरपासून ऑनलाईन तिकीट बुकिंगचे नवे नियम लागू

0

नवी दिल्ली, दि. १५ सप्टेंबर २०२५ Online Train Ticket Booking  भारतीय रेल्वेने ऑनलाईन तिकीट बुकिंगच्या नियमात मोठा बदल जाहीर केला आहे. हा नवा नियम १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणार असून, कोणत्याही ट्रेनसाठी जनरल आरक्षणाची ऑनलाईन तिकीटे बुक करताना पहिल्या १५ मिनिटांत केवळ आधार-व्हेरीफाईड युजर्सनाच तिकीट बुक करता येणार आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, या निर्णयामागे उद्दिष्ट योग्य प्रवाशांना तिकीटांचा प्राधान्याने लाभ मिळावा हे आहे. आतापर्यंत तत्काळ तिकीट बुकिंगसाठीच आधार-व्हेरीफिकेशन अनिवार्य होते, मात्र आता हा नियम सामान्य आरक्षणालाही लागू होणार आहे.

सध्या जनरल आरक्षणाची तिकीटे प्रवासाच्या तारखेच्या ६० दिवस आधी बुक करता येतात. आरक्षण मध्यरात्री १२.२० वाजता सुरु होते आणि ११.४५ वाजेपर्यंत उपलब्ध असते. मात्र, ऑक्टोबरपासून १२.२० ते १२.३५ या वेळेत फक्त आधार-व्हेरीफाईड अकाऊंटधारकांनाच ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. या कालावधीत इतरांना तिकीट बुकिंग करता येणार नाही.

नवीन नियमाचे उदाहरण: (Online Train Ticket Booking)

उदाहरणार्थ, नवी दिल्लीवाराणसी शिवगंगा एक्सप्रेसचे १५ नोव्हेंबरचे तिकीट जर बुक करायचे असेल, तर हे आरक्षण १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.२० वाजता सुरु होईल. आता १२.२० ते १२.३५ या दरम्यान फक्त आधार-व्हेरीफाईड युजर्सनाच तिकीट बुक करता येईल. आधार व्हेरीफिकेशन नसलेल्या युजर्सना या वेळेत प्रवेश मिळणार नाही.

जुलै २०२५ मध्ये रेल्वेने तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार-व्हेरीफाईड बंधनकारक केले होते. आता त्याच नियमाचा विस्तार सामान्य आरक्षणासाठीही होणार आहे. या बदलामुळे तिकीटांची दलाली कमी होऊन प्रामाणिक प्रवाशांना मोठा फायदा होईल, असा विश्वास रेल्वे मंत्रालयाने व्यक्त केला आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!