“आमच्या २६ महिलांचा सिंदूर पुसला,माघार घेण्याची गरज नव्हती”:संजय राऊतांचा संतप्त सवाल

1

नवी दिल्ली, दि. ११ मे २०२५- Operation Sindoor Sanjay Raut भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेला तणाव आता निवळला असून शस्त्रसंधी लागू झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे हे शक्य झालं असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, याच मुद्यावरुन खासदार संजय राऊतांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले,“डोनाल्ड ट्रम्प यांचा यात काय संबंध? आमची माणसे मेली आहेत. आमच्या २६ महिलांचा सिंदूर पुसला आहे. मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण होण्याआधी ट्रम्प कोणत्या अधिकाराने मध्यस्थी करतात?”

राऊत पुढे म्हणाले,”भारताची बेअब्रू झाली आहे. युद्ध टप्प्याटप्प्याने जिंकत असताना अचानक युद्धबंदी जाहीर करणे हे देशाच्या सैन्याच्या मनोबलावर घाला आहे.” त्यांनी असा सवालही केला की, “पंतप्रधान मोदी ट्रम्पकडे का गेले? जेव्हा २६/११ नंतर ओबामाकडे जाणं चुकीचं होतं असं म्हणत होते, आता तेच का करत आहेत?”

राऊतांनी (Operation Sindoor Sanjay Raut) युद्धबंदीवर प्रश्न उपस्थित करत मोदी सरकारवर आणि अमेरिकेच्या हस्तक्षेपावर जोरदार टीका केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “युद्धबंदीची गरज नव्हती. लाहौर, कराची, इस्लामाबाद हे शहरं ताब्यात येण्याच्या मार्गावर होती. ही पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याची संधी होती.”

शेवटी त्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी करत सांगितले की, “पंतप्रधान मोदींनी स्वतः उपस्थित राहून स्पष्टता द्यावी, कारण हे राष्ट्रीय सुरक्षेचं आणि शहीदांच्या सन्मानाचं प्रकरण आहे.”

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] “आमच्या २६ महिलांचा सिंदूर पुसला,मा… […]

Don`t copy text!