📍 इस्लामाबाद, ८ मे २०२५ – Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताला एक मोठं यश मिळालं आहे. 1999 च्या कंधार विमान अपहरण प्रकरणाचा मास्टरमाइंड आणि जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी रौफ असगर (Rauf Asghar) याचा खात्मा झाला आहे. भारताच्या वायुदलाने केलेल्या हवाई हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे.
रौफ असगर हा मसूद अझहरचा सख्खा भाऊ होता आणि 1999 मध्ये IC-814 विमान अपहरणात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्या घटनेमुळे भारत सरकारला तीन कुख्यात दहशतवाद्यांना—मसूद अझहर, उमर सईद शेख आणि मुश्ताक अहमद झरगर—सोडावं लागलं होतं. ही घटना भारताच्या नागरी उड्डाण इतिहासातील सर्वांत वादग्रस्त ठरली होती.
ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor)अंतर्गत भारतीय लष्कर आणि वायुदलाने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला चढवला होता. यात मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ जणांचा अंत झाला. यात रौफ असगरचा मुलगा हुजैफा आणि भावजईचाही समावेश होता.
भारतीय वायुदलाच्या अचूक कारवाईमुळे जैश-ए-मोहम्मदला मोठा धक्का बसला आहे. रौफ असगरसारख्या ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवाद्याचा खात्मा झाल्याने भारताच्या दहशतवादविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.
🟥 ब्रेकिंग न्यूज | ऑपरेशन सिंदूरमध्ये मोठं यश
कंधार विमान अपहरण प्रकरणातील मास्टरमाइंड रौफ असगर ठार!
🔹 भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी रौफ असगरचा खात्मा
🔹 भारतीय वायुदलाच्या हवाई हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर झाला मृत्यू
🔹 मसूद अझहरचा सख्खा भाऊ आणि IC-814 विमान अपहरणाचा मुख्य सूत्रधार
🔹 मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ जणांचा देखील अंत
🔹 जैश-ए-मोहम्मद संघटनेला जबरदस्त धक्का
🔹 ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त
🔹 दहशतवादाविरोधात भारताचं आणखी एक निर्णायक पाऊल
 
Sunrise in Sialkot Pakistan.🔥 pic.twitter.com/89RtzJilV4
— Ajit Doval ᴾᵃʳᵒᵈʸ🇮🇳 (@IAjitDoval_IND) May 7, 2025
;
[…] […]
[…] […]