ऑर्केस्ट्रॉ असोसिएशनतर्फे ज्ञानेश्वर कासारांना संगीत शिक्षक पुरस्कार जाहीर
संस्थेच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा
नाशिक,२६ ऑगस्ट २०२२ – नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रॉ असोसिएशनच्या वतीने दरवर्षी संगीत शिक्षक पुरस्कार दिला जातो. यंदाचा संगीत शिक्षक पुरस्कार प्रसिद्ध गायक ज्ञानेश्वर कासार यांना जाहीर झाल्याचे असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील ढगे यांनी सांगितले. महाकवी कालिदास कलामंदिरातील नाट्य परिषदेच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ज्ञानेश्वर कासार त्यांनी संगीत शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला. स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असो. च्या वतीने अनेक सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.या वर्षी देखील संस्थेने अनेक सांगीतिक उपक्रम राबविण्याचे ठरविले असून वर्षभर दर्जेदार संगीत कार्यक्रम,गायक वादक,साऊंड यांचेसाठी कार्यशाळा आयोजन असे उपक्रम घेणे नियोजित केले आहे असो.सर्व सभासद आणि पदाधिकारी हे सर्व यात सहकार्य करतील असा विश्वास संस्थापक उमेश गायकवाड व सचिव सुनील ढगे यांनी व्यक्त केला.
शिक्षकदिनी ५ सप्टेंबर रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. मात्र यंदा त्या दरम्यान गणेशोत्सव असल्याने त्यानंतर हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार ज्ञानेश्वर कासार असल्याचे यावेळी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष उमेश गायकवाड यांनी सांगितले. यावेळी असोसिएशनची विशेष सभाही पार पडली. यात घटनेच्या कार्यकारिणीवर चर्चा करण्यात आली. संस्थेतील प्रत्येक कलाकाराला संस्थेच्या कार्यकारिणीत काम करण्याची संधी मिळावी या उद्देशाने दर तीन वर्षांनी कार्यकारिणीत बदल करावे अशी संस्थेच्या घटनेत तरतूद आहे. गेल्या दोन अडीच वर्षांत कोरोना, लॉकडाऊन यामुळे कार्यकारिणीत सुनील ढगे जयंत पाटेकर रवींद्र बराथे
असोसिएशनची नवीन कार्यकारिणी अशी
कार्याध्यक्ष : डॉ. विकास देव, खजिनदार: नंदू देशपांडे, सह सेक्रेटरी मंदार पगारे, सदस्य: विजय महंत, प्रशांत महाले, अभिजित शर्मा, महिला प्रतिनिधी : स्मिता पाटील, दीपाली विसपुते, सल्लागार विश्वास ठाकूर, आनंद सोनवणे, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी. बदल करण्यात आले नव्हते. मात्र या काळातही संस्थेने कलाकारांना आर्थिक आणि अन्नधान्य अशी तब्बल १० लाखांची मदत केली. यंदा मात्र सर्व सदस्य, पदाधिकाऱ्यांनी कार्यकारिणीत बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता संस्थेच्या अध्यक्षपदी सुनील ढगे, उपाध्यक्षपदी जयंत पाटेकर तर सचिवपदी रवींद्र बराधे यांची निवड करण्यात आली.