ठाण्यात ५० वर्षांवरील कलाकारांसाठी एकांकिका स्पर्धांचे आयोजन
मोरया - इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटचा उपक्रम
मुंबई,दि,१६ फेब्रुवारी २०२५ – मराठी रंगभूमी वर बर्याच एकांकिकां स्पर्धा होत असतात.त्यातल्या कित्येक स्पर्धा आंतरमहाविद्यालयीन किंवा खुल्या असतात. ह्या स्पर्धांमध्ये तरुणाईचा जल्लोष आणि उत्साह दिसून येतो. फार क्वचितच कधीतरी ५० वयाच्या पुढचे कलाकार दिसून येतात. पण तसं पाहायला गेलं हाच वयोगट सर्वात जास्त अनुभवी असतो. खास ह्याच ५० आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत, उत्तरार्ध एकांकिका स्पर्धा भरवण्यात आली आहे. ह्या स्पर्धेचे आयोजन मोरया – इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट तर्फे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या नियोजनात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखेचे विशेष सहकार्य लाभणार आहे.
कलेला वय नसतं असं म्हणतात पण तरुणाईच्या जल्लोषात ५० आणि त्यापेक्षा जास्त वय असणार्या लोकांना एकांकिका स्पर्धेत सादरीकरण करण्याची संधी फार कमी वेळा मिळते. वास्तविक पाहता हाच वर्ग सर्वात जास्त अनुभवी व संयमी असतो. अशा वयोगटाला एकांकिका सादर करण्याची संधी मिळावी आणि त्यातून सध्याच्या तरुणाईला त्यांच्या अभ्यासपूर्ण सादरीकरणाने शिकायला मिळावा ह्याच हेतूने ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. स्पर्धेची मूळ संकल्पना श्री रवी मिश्रा ह्यांची आहे.
ह्या स्पर्धेद्वारे सध्याच्या जेन झी,जेन अल्फा च्या जमान्यातील तरुणांना भरपूर शिकायला मिळेल आणि मनाने तरुण असणार्या ज्येष्ठ कलाकारांकडून उत्तम एकांकिका सादर होतील असा विश्वास संस्था प्रमुख प्रफुल्ल गायकवाड ह्यांनी व्यक्त केला आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी १५ व १६ मार्च २०२५ रोजी ठाण्यातील वारकरी भवन येथे होणार आहे. तर अंतिम फेरी जागतिक रंगभूमी दिवस २७ मार्च २०२५ रोजी डॉ काशिनाथ घाणेकर मोठे नाट्यगृह, ठाणे येथे संपन्न होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्याची शेवटची तारीख १० मार्च २०२५ आहे. स्पर्धेचा प्रवेश अर्ज आणि चौकशी साठी 9920137805 ( शिशिर ), 9930538204 ( योगेश ) या नंबर वर संपर्क करू शकतात. तसेच नवीन अपडेट साठी टीम मोरया च्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेज ला फॉलो करावे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी ह्या स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे .
स्पर्धेचा विशेष नियम –
स्पर्धक संघातील प्रत्येक सदस्याचे वय ५० किंवा त्यापेक्षा अधिक असावे.