नाशिक,दि. २७ जुलै २०२३ –कलानंद कथक नृत्य संस्थे तर्फे गुरूपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हा उत्सव मंगळवार दि.१ऑगस्ट २०२३ रोजी कालिदास कलामंदिर नाशिक येथे सायंकाळी ५:३० वाजता आयोजित केला आहे.अशी माहिती नृत्यगुरू डॉ सुमुखी अथणी यांनी दिली आहे.
कलानंद या वर्षी आपले ४३ वे वर्ष साजरे करत आहे. त्या निमित्त ‘कथक परिक्रमा’या कार्यक्रमा अंतर्गत नवोदित व ज्येष्ठ विद्यार्थ्यांच्या विविध नृत्याचा अनुभव रसिकांना घेता येणार आहे. या वर्षाच्या कार्यक्रमाची विशेष प्रस्तुती म्हणून ‘तालचक्र’ या रचनेचे सादरीकरण होणार आहे.या रचनेची संकल्पना श्री.प्रशांत महाबळ यांची आहे तर श्री नितीन पवार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. कलांनद च्या संचालिका गुरू संजीवनी कुलकर्णी लिखित ‘कथक आरंभ’या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्ती चे प्रकाशन ही मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
या सर्व कार्यक्रमासाठी पुष्कराज भागवत, ज्ञानेश्वर कासार,प्रतिक पंडित, व्यंकटेश तांबे, कुणाल काळे व अद्वय पवार यांची संगीत साथ असून नृत्य दिग्दर्शन डॉ. सुमुखी अथणी व संजिवनी कुलकर्णी यांचे आहे. कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुला असून नाशिककर रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थे तर्फे करण्यात आले आहे.