सारडा कन्याविद्यामंदिर माजी विद्यार्थीनींच्या ‘सारडा सखी’ स्नेह मिलनाचे आयोजन

0

नाशिक,दि. १३ एप्रिल २०२३ – नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या विद्यामंदिर नाशिकच्या माजी विद्यार्थीनीचे स्नेहमिलन ‘सारडा सखी’ नावाने आयोजित करण्यात आले आहे. सन 1961 ते 2020 या काळातील माजी विद्यार्थींनी यात सहभागी होणार आहेत. सारडा कन्या विद्यामंदिर, नेहरू गार्डन जवळ, शालीमार येथे रविवार दि. ७ मे २०२३ रोजी सकाळी ९ ते ५ या वेळात हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

सारडा कन्या विद्यामंदिरच्या अनेक विद्यार्थीनींनी जगभरात आपल्या कर्तृत्वाने नावलौकिक संपादन केला असून विविध क्षेत्रात यशस्वी झाल्या आहेत.मोठ्या पदांवर कार्यरत आहेत व शाळेचा गौरव साता समुद्रापार नेला आहे. या मेळाव्यासाठी नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर, कार्यवाह राजेंद्र निकम व विश्वस्त मंडळाचे सहकार्य मेळाव्याच्यास लाभले आहे. तरी या मेळाव्यास उपस्थित असे आवाहन संगिता ठाकूर ,सारिका देशपांडे, मंजिरी रत्नपारखी, स्वप्नजा जोशी करण्यात यांच्या तर्फे करण्यात आले आहे. अधिक माहिती साठी खालील नंबर संपर्क साधावा असे आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
संगिता ठाकूर (मो.9422706224), 
सारिका देशपांडे (मो.8380016504), 
मंजिरी रत्नपारखी (मो.9921664007), 
स्वप्नजा जोशी (मो.9665233280)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.