नाशिक,७ फेब्रुवारी २०२३ – भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी नाशिकचे कलाश्री गुरुकुल व कुसुमाग्रजांनी स्थापन केलेल्या लोकहितवादी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (१० फेब्रुवारी)रोजी संध्याकाळी ६ वाजता, गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यासाच्या, कुर्तकोटी सभागृहात स्वराधिराज या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची संपूर्ण गानयात्रा सादर होणार आहे. ज्यामध्ये ज्येष्ठ गायक डॉ.आशिष रानडे यांचे शास्त्रीय गायन तसेच अभंग सादर होणार आहेत भारतीय संगीत क्षेत्रात पं. भीमसेन जोशी यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरते. शास्त्रीय संगीत भक्तीरसातून जनसामान्यापर्यंत रुजवण्यात आणि भक्ती संगीत रसिकांच्या ओठांवर रूळवण्यातया दिग्गज गायकाचा फार मोठा वाटा आहे. या ऋषीतुल्य व्यक्तीच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पं. भीमसेन जोशी यांचा सांगीतिक वारसा लाभलेले आनंद भाटे यांचे शिष्य डॉ.आशिष रानडे हे महोत्सवात आपली गायकी सादर करणार आहेत. डॉ आशिष रानडे हे डॉ अविराज तायडे आणि पं आनंद भाटे यांचे शिष्य असून गेली २० वर्षे ते या दोघांकडून तालीम घेत आहे. संगीत विषयात डॉक्टरेट तसेच आकाशवाणी चे ए ग्रेडचे शास्त्रीय गायक म्हणून ते ओळखले जातात. २०२० चा आयसीएम ए आर्टिस्ट ऑफ द इयर हा सन्मान प्रसिद्ध गायक महेश काळे यांच्याकडून प्राप्त झाला आहे. पं गजानन बुवा जोशी स्मृती पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त आहेत तसेच भारतात.अनेक मान्यवर महोत्सवात तसेच परदेशातही त्यांचे सादरीकरण झाले आहे.
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जयंतीनिमित्त कलाश्री संगीत गुरुकुलातर्फे फेब्रुवारी महिन्यात पंडित भीमसेन जोशी यांच्या जयंतीनिमित्त ‘स्वराधिराज’ संगीत महोत्सव सुरू व्हावा असा विचार मनात आला आणि या महोत्सवाची २०१७ मध्ये सुरुवात झाली. पहिल्या वर्षी भीमसेन जोशी यांचे शिष्य डॉक्टर अविराज तायडे यांची मुलाखत आणि शास्त्रीय गायन असा करण्यात आला ज्याला नाशिककरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.
त्यानंतर जेष्ठ गायिका मंजूषा पाटील यांच्या शास्त्रीय गायनाची मैफल आयोजित करण्यात आली होती त्यालाही नाशिकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला . त्यानंतर २०१९ साली भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जयंती निमित्त अभंग भक्तीगीत गायनाची स्पर्धा घेण्यात आली ज्याला जवळपास तिनशे स्पर्धकांनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली २०२०, २०२१ ही दोन्ही वर्ष कोविड मुळेआयोजन करणे शक्य नाही.
या कार्यक्रमात डॉक्टर आशिष रानडे यांच्या गायनातून तसेच प्रसिद्ध निवेदक आणि संवादक धनेश जोशी यांच्या संवादातून रसिकांना भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची गानयात्रा अनुभवता येईल. कार्यक्रमाला तबल्याची साथसंगत सौरभ क्षीरसागर, हार्मोनियम दिव्या रानडे,पखवाज दिगंबर सोनवणे, तालवाद्य अमित भालेराव यांची असणार आहे. तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलनप्रसिद्ध निवेदीका स्नेहा रत्नपारखी करणार आहेत.
भारतरत्न भीमसेन जोशी यांना नाशिककरांकडुन ही आदरांजली अर्पण करण्यासाठी रसिकानी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचा आवाहन कलाश्रीचे संचालक डॉ.आशिष रानडे यांनीकेले आहे.