नाशिक – अभिजात नृत्य,नाट्य,संगीत अकादमी तर्फे नाशिकमध्ये “नाट्यांगण” या उपक्रमाची सुरुवात होत आहे.नाटक आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व कलांच्या विधिवत प्रशिक्षणाची आणि नियमित सादरीकरणाची व्यवस्था नशिकमध्ये असावी हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
शालेय,महाविद्यालयीन पातळीवर होणाऱ्या स्पर्धा,महोत्सव याबद्दल जागरूकता पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावी यासाठी हा उपक्रम प्रयत्नशील असणार आहे.नाटकाचा रंगमंचीय आविष्कार हा तर प्रमुख हेतू आहेच,त्यासोबत संहिता,प्रकाशयोजना,नेपथ्य,ध्वनिसंयोजन,दिग्दर्शन,वेशभूषा ,रंगभूषा अशा विविध अंगांचे सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावे हा देखील महत्वाचा उद्देश आहे.
ज्येष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शक,गायक आणि संगीतकार श्री.सुनील देशपांडे स्वतः या उपक्रमात जातीने मार्गदर्शन करणार आहेत. उपक्रमचा प्रारंभ १ ते १० जून २०२२ या कालावधीत होत आहे.त्यानंतर,विद्यार्थी आणि आयोजक यांच्या सोयीनुसार हा उपक्रम मासिक स्वरूपात सुरु राहणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन अभिजात नृत्य,नाट्य,संगीत अकादमी २,गोशिबा पार्क,डिसुझा कॉलोनी,कॉलेज रोड ,नाशिक. येथे सकाळी सकाळी ९.३० ते दुपारी १या वेळेत होणार आहे.आपल्या पाल्यातील सुप्त नाट्यगुणांना वाव देणाऱ्या सुयोग्य संधीचा नाशिककर पालकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.