लोकचित्र शैलींचे दस्तावेजीकरण होणे गरजेचे – कृणाल पाटील

0

नाशिक ,दि.११ ऑगस्ट २०२३ – एकाच  छताखाली भारतातल्या विविध प्रांतातील लोकचित्र शैली प्रथमच एकत्र आल्या आहेत.त्यांचे दस्तावेजीकरण होणे गरजेचे आहे.अभ्यासपूर्ण परिचय करून देणारे कॉफी टेबल बुक व ई – बुक तयार करावे. त्यासाठी क्रेडाई पुढाकार घेऊन सहकार्य करेल.असे प्रतिपादन क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ चित्रकर्ती मुक्ता बालिगा, चित्रकार व कलादिग्दर्शक आनंद ढाकीफळे उपस्थित होते. संजय देवधर यांनी या कलांचा अभ्यासपूर्ण परिचय करून दिला

वारली आर्ट फाउंडेशनतर्फे लोकचित्र संगम कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात प्रथमच दि. १ ते ३१ ऑगस्ट दरम्यान हा अनोखा उपक्रम नाशिकरोडच्या पु. ना. गाडगीळ शोरूममधील कलादालनात सुरु झाला आहे. त्यात भारतातील विविध वैशिष्ट्यपूर्ण लोकचित्र शैलीतील आकर्षक कलाकृतींचा समावेश असून एकूण २५ कलाकार सहभागी झाले आहेत. प्रत्येक आठवड्याला ६ कलाकार त्यांची चित्रे प्रदर्शित करतील. संकल्पना व संयोजन पत्रकार व वारली चित्रशैली अभ्यासक संजय देवधर यांचे आहे. या मालिकेतील दुसऱ्या चित्रप्रदर्शनाचे उदघाट्न बुधवारी (दि. ९) करण्यात आले.

P.n Gadgil Art Gallery/Nashik News/There is a need to document folklore styles - Krunal Patil

सायंकाळी ५ वाजता या उदघाट्न समारंभ  झाला. प्रमुख पाहुण्यांनी कलाकारांच्या कलाकौशल्याचे कौतुक करून या अनोख्या उपक्रमाविषयी समाधान व्यक्त केले.आपली कला संस्कृती जपून पुढील पिढ्यांपर्यंत  पोहोचवावी असे त्यांनी सांगितले. देवधर यांनी स्वागत, प्रस्ताविक केले. ते म्हणाले, पहिल्या प्रदर्शनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व  चांगली चित्रविक्री झाली. दि.९ ते १६ दरम्यान श्रद्धा शेतकर, कविता बरवे, शिल्पा भाटिया, श्वेता गरे, नेहा बरवे, मनीषा अग्रवाल, सायली झांबरे आणि संजय देवधर यांची विविध राज्यांच्या शैलीतील सुंदर चित्रे मांडण्यात आली आहेत. रसिकांना ती बघायला मिळतील. पालकांनी मुलांनाही ती आवर्जून दाखवावी. कलाकारांच्या वतीने शिल्पा भाटिया यांनी मनोगत व्यक्त केले. मेघा पिंपळे यांनी सूत्रसंचालन केले तर श्रद्धा शेतकर यांनी आभार मानले.

दि.१७ ते २३ ऑगस्ट दरम्यान तिसऱ्या प्रदर्शनात अपूर्वा भंडारे, सुप्रिया जोशी, देविका काशीकर, स्नेहल बंकापुरे, आदिती पळसुले आणि दि.२४ ते ३१ ऑगस्ट या चौथ्या व शेवटच्या प्रदर्शनात पद्मजा ओतूरकर, माधवी पाठक, श्रद्धा रावळ, निवेदिता पोतदार व स्मिता गांगल यांच्या चित्रांचा समावेश असेल. हा संपूर्ण कलामहोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. कलारसिकांनी चित्रप्रदर्शनाला उपस्थित राहून कलाकृतींचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संयोजक संजय देवधर व सर्व सहभागी कलाकारांनी केले आहे. महाराष्ट्रातील आदिवासी वारली चित्रशैली सुपरिचित आहे. त्या खालोखाल बिहारची मधुबनी कला रसिकांना माहिती आहे. पण विविध प्रांतांच्या लोकचित्र शैलींचा संगम एकाच छताखाली बघायला मिळत असून नाशिककर कलारसिकांसाठी ही अपूर्व मेजवानी आहे.येथे चित्रे अल्पदरात खरेदीही करता येतील.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!