मुंबई, ८ जुलै २०२५ – Paaru Zee Marathi Serial झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘पारू’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात भावनांची लाट निर्माण करत आहे. कित्येक महिने आदित्य आणि पारूच्या नात्याला मान्यता मिळावी, अशी सर्वांची इच्छा होती. अखेर, देवीच्या उत्सवात नियती मोठा निर्णय देणार आहे.
पारूच्या गळ्यातले मंगळसूत्र पाहून आदित्य गोंधळतो. मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते. पारूचं निस्वार्थ प्रेम, तिचं समर्पण आणि दिशाचे टोमणे यामुळे आदित्य अस्वस्थ होतो. अखेर, आदित्य पुन्हा एकदा धाडसी निर्णय घेतो – पारूशी विधीवत विवाह करण्याचा!
मालिकेत देवीचा उत्सव सुरू आहे. गुरुजी संपूर्ण गावाला आमंत्रण देतात. दमिनी दिशाला “नववधू” म्हणून पुढे आणण्याचा आग्रह करते. मात्र, आदित्य याला विरोध करतो. यामुळे दिशासोबत त्याचा वाद होतो. त्याचवेळी पारू हे मंगळसूत्र फक्त एक खोट्या लग्नाचं प्रतीक असल्याचं गुरुजीसमोर सांगते. पण गुरुजी तिला थांबवतात आणि सांगतात की “हे मंगळसूत्र आदित्यच्या आयुष्याचं कवच आहे.”
अहिल्या आदित्यच्या सुरक्षिततेसाठी एक पवित्र यज्ञ करण्याचं ठरवते. आणि याच यज्ञ, उत्सव, आणि देवीच्या उपस्थितीत गुरुजी सर्वांसमोर आदित्य-पारूचं खरंखुरं, विधीवत लग्न लावून देतात.
हा एक दिव्य संयोग ठरतो. या विवाहाच्या साक्षीने प्रेम, श्रद्धा आणि सत्याचं विजय होतं. दिशाशी आणि दमिनीसोबतच्या खेळींना यावेळी नियतीचं बळ थांबवतं. अहिल्या यज्ञ पूर्ण करते आणि त्या क्षणी आदित्य-पारू एकत्र येतात, गुरुजींचं आशीर्वाद घेतात.
प्रेक्षकांसाठी हा क्षण हा भावनिक उत्कटतेचा शिखर ठरणार आहे.( Paaru Zee Marathi Serial)
👉 पुढील भागांत काय होईल? दमिनीची पुढची खेळी काय असेल? हे पाहणं रंजक ठरणार आहे.