संस्कृती नाशिकतर्फे पाडवा पहाट : स्नीती मिश्रा यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध
पिंपळपारावर राग, भैरव, ठुमरीतून गुंजले स्वर
नाशिक,दि,१५ नोव्हेंबर २०२३- जागी जगदंब जागिनी, बीन हरी गौन विलंबित बडा ख्याल, द्रुतख्याल राग, भैरव, ठुमरीतून पंडिता स्नीती मिश्रा यांनी केलेल्या गायनाने पहाट पाडवा कार्यक्रमात श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. संस्कृती नाशिक आयोजित पाडवा पहाट या कार्यक्रमाचे २५ वे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने नाशिककरांनी या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद दिला.या कार्यक्रमात डॉ. कैलास कमोद यांचा संस्कृती नाशिक पुरस्काराने सपत्नीक सन्मान करण्यात आला.
संस्कृती नाशिकच्या २५ व्या रौप्य महोत्सवी पाडवा पहाट कार्यक्रमाप्रसंगी केंद्रिय आरोग्य राज्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. भारती पवार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, भाजपचे प्रदेश सचिव लक्ष्मण सावजी, सरचिटणीस सुरेश पाटील, श्री साईबाबा हार्ट इन्स्टिटूटचे संचालक डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, माजीमंत्री शोभा बच्छाव, बबनराव घोलप, उल्हास सातभाई, अशोक मुर्तडक, यतीन वाघ, ॲड. जयंत जायभावे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, शरद आहेर, विनायक खैरे, विश्वास बँकेचे संचालक विश्वास ठाकूर, सी. एल. कुलकर्णी, मामा राजवाडे, गुरमित बग्गा,मिलिंद गांधी, संस्कृती नाशिकचे शाहू खैरे आदी उपस्थित होते.
पियू आरोळे यांनी सूत्रसंचालन केले. पंडिता स्नीती मिश्रा यांना तबला पंडित अजित पाठक, सारंगीची साथ ज्येष्ठ सारंगी वादक उस्ताद मेहमूद खान (सारंगी सम्राट) यांचे नातू उस्ताद मोमीन खान, संवादिनी वादन ज्येष्ठ हार्मोनियम वादक पंडित सुभाष दसककर, तानपुरा गायत्री पाटील, साक्षी भालेराव यांनी साथसंगत केली..
छायाचित्र सौजन्य : महारुद्र अष्टुरकर