तुला मारले तर मोदींना कोण सांगणार :पर्यटकांवर गोळीबार करताना दहशतवाद्यांचं विधान

काश्मीरला गेलेल्या पतीला पत्नी आणि मुलाच्या देखतच दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या.

0

नवी दिल्ली,दि,२३ एप्रिल २०२५ – भारताचे नंदनवन असणाऱ्या जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये काल दुपारी दहशदवादी हल्ला झाला या हल्ल्यात २७ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मधे महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश होता. २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतरचा हा सर्वात घातक हल्ला मानला जातोय .

पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियात असताना गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याची माहिती दिली .पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म x माध्यमावर पोस्ट करत हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला .भारत या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कठोर पाऊले उचलणार असल्याचे वृत्त आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीला परत आल्यानंतर यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ( NSA) अजित डोवाल तसेच परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जय शंकर आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्याशी बैठक घेतली

भारत बदला घेणार:कोणालाही सोडणार नाही’:पंतप्रधान नरेंद्र मोदी
हल्ल्याची माहिती मिळताच सौदी अरेबिया होऊन परत येताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर केलेला नाही . हल्ल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौरा मध्येच थांबवला आणि ते दिल्लीला रवाना झाले . जेद्दाहून परतताना पंतप्रधान मोदींचे विमान IF बोईंग 777- 300 (KA06 ) ने पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर न करता भारतात परतले .

या हल्ल्यात जो कोणी सहभागी असेल त्याला सोडले जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली .पिढी त्यांच्या कुटुंबीयांना सांत्वन दिले .या भयानक गुन्ह्यामागे जो कोणी असेल त्याला शिक्षा केली जाईल असेही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत .आम्ही त्यांना त्यांच्या अजेंड्यात यशस्वी होऊ देणार नाही .दहशतवाद विरुद्ध लढण्याचा निर्धार दृढ आणि दृढच आहे, असेही त्यांनी सांगितले .

तुला मारले तर मोदींना कोण सांगणार :पर्यटकांवर गोळीबार करताना दहशतवाद्यांचं विधान
प्रत्यक्ष दर्शनी सांगितलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी प्रथम पर्यटकांची नावे नंतर त्यांचा धर्म विचारला आणि नंतर जबरदस्तीने कलमा म्हणण्यास सांगितले तुम्ही लोकांनी मोदीला डोक्यावर बसवलंय, असं दहशतवाद्यांनी पर्यटकांना म्हटलं असल्याचा दावा केला जात आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याबाबत प्रत्यक्षदर्शींनी जे काही सांगितलं ते मन विचलित करणारं आहे. पुण्याची पर्यटक पहलगाम येथे फिरण्यासाठी गेली होती. तेव्हा तिने एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांना पोलिसांची वर्दी परिधान केली होती आणि मास्कदेखील घातले होते. हल्लेखोरांनी फक्त पुरुषांवरच गोळीबार केला आणि हिंदूंना जबरदस्ती कलमा वाचायला लावण्याचा प्रयत्न केला. ज्यांना वाचता आलं नाही त्यांच्यावर गोळ्या चालवल्या. ज्यांना कलमा म्हणता येत नव्हता किंवा ज्यांना संकोच वाटत होता त्यांना तिथेच गोळ्या घालून ठार मारण्यात आले .या हल्ल्यात दहशतवादांनी बहुतेक हिंदू पुरुषांना लक्ष केले होते .प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पत्नी आणि मुलासोबत काश्मीरला गेलेल्या पतीला पत्नी आणि मुलाच्या देखतच दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या .जेव्हा महिलेने तिलाही गोळी घालण्यास सांगितले तेव्हा हल्लेखोर म्हणाले ‘आम्ही तुम्हाला गोळ्या घालणार नाही जाऊन मोदींना हल्ल्याबद्दल सांगा .

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!