सांबा सेक्टरमध्ये पुन्हा पाकिस्तानी ड्रोनची हालचाल 

2

नवी दिल्ली, १३ मे २०२५ – Pakistan, Drone Activity भारत-पाकिस्तान यांच्यात १० मे रोजी युद्धविराम जाहीर करण्यात आला असला तरी पाकिस्तानकडून सिजफायरचे उल्लंघन थांबताना दिसत नाही. सोमवारी रात्री १० वाजता जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी ड्रोन दिसल्याची माहिती एएनआयने दिली आहे.

लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ड्रोनमुळे(Pakistan, Drone Activity ) घाबरण्याचं काही कारण नाही, आणि भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेनं ते तात्काळ निष्क्रिय केले.

याच रात्री, सायंकाळी ८:५० च्या सुमारास पठाणकोटमध्ये देखील काही ड्रोन आकाशात दिसले, जे जालंधरच्या दिशेने जात होते. लष्कराने संपूर्ण भागात ब्लॅकआऊट करून सतर्कता वाढवली होती. काही वेळ लाल रेषा आणि स्फोटासारखे आवाज ऐकायला मिळाले, ज्यामुळे नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी रात्री ८ वाजता देशाला उद्देशून भाषण करत पाकिस्तानला थेट इशारा दिला. त्यांनी पाकिस्तान सरकार आणि दहशतवादी संघटनांमधील संबंध जगासमोर उघड केले आणि दहशतवादाचा पूर्ण बीमोड करण्याचा निर्धार पुन्हा एकदा व्यक्त केला. त्यांच्या भाषणानंतर अवघ्या काही तासांतच हे ड्रोन प्रकरण समोर आल्याने, पाकिस्तानकडून अजूनही कुरापती सुरू असल्याचं स्पष्ट होत आहे.

तसेच, जालंधरच्या आदमपूर रोडवर चुहदवालीजवळील मार्कफेड कार्यालयात एक क्षेपणास्त्राचा तुकडा आणि एक शेल सापडल्याची माहितीही समोर आली. सुरक्षा दलांनी ते ताब्यात घेऊन शेल नष्ट केला आहे.

दुसरीकडे, भटिंडा येथे लग्नात फटाके फोडल्यामुळे नवरदेवाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीसीने संपूर्ण परिसरात आतषबाजी, फटाके आणि ड्रोनवर बंदी घातली आहे.

फाजिल्का जिल्ह्यातील मुथियानवाली गावाजवळ एक गंजलेला बॉम्ब सापडल्याची घटना रविवारी रात्री घडली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार तो बॉम्ब जुना असून सध्या कोणताही धोका नाही.

भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणा पाकिस्तानकडून होणाऱ्या कुठल्याही कारवाईला उत्तर देण्यासाठी पूर्णतः सज्ज आहेत, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

2 Comments
  1. […] सांबा सेक्टरमध्ये पुन्हा पाकिस्तानी… […]

  2. […] दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. त्याच […]

Don`t copy text!