📍 जम्मू-काश्मीर | दि. ८ मे २०२५-‘ Pakistan Shells Indian Border Villages ऑपरेशन सिंदूर’ नंतर नियंत्रण रेषेवर (LoC) पाकिस्तानने भीषण गोळीबार केला असून, यात किमान १५ नागरिकांचा मृत्यू, तर ५७ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. गोळीबारात चार लहान मुले आणि एक जवानही मृत्युमुखी पडले आहेत. पुंछ, उरी, तंगधार, बारामुला, कुपवाडा यासारख्या सीमावर्ती भागात तोफगोळ्यांचा आवाज ऐकायला मिळाला.
पुंछ जिल्ह्यातील स्थिती सर्वात गंभीर असून, १९७१ च्या युद्धानंतर प्रथमच सार्वजनिक ठिकाणी, घरे आणि सरकारी इमारतींवरही तोफेचे गोळे पडले. एक गुरुद्वाराही लक्ष्य ठरला, ज्यात तीन सिख बांधवांचे दुर्दैवी निधन झाले.
📌 मृतांची ओळख:
बलविंदर कौर (३३), मोहम्मद जैन खान (१०), जोया खान (१२), अमरीक सिंह (५५), मोहम्मद इकबाल (४५), रणजीत सिंह (४८), विहान भार्गव (१३), मरियम खातून (७), अमरजीत सिंह (४७), मोहम्मद रफी (४०) व इतर.
📍 प्रमुख ठिकाणी झालेला हल्ला: Pakistan Shells Indian Border Villages
पुंछ – बालाकोट, मेंढर, मनकोट, कृष्णा घाटी, केरनी परिसरात गोळीबार.
बारामुला – उरी सेक्टरमध्ये १० नागरिक जखमी.
राजौरी – ३ नागरिक जखमी.
कुपवाडा – करनाहमध्ये घरांना आग.
🛡️ भारतीय सेनेचे प्रत्युत्तर:
भारतीय सेनेने पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त करत जबरदस्त प्रत्युत्तर दिले. संरक्षण प्रवक्त्यांनी सांगितले की, शत्रुपक्षाचे मोठे नुकसान झाले असून, गोळीबारात त्यांच्या अनेक चौक्या उध्वस्त झाल्या.
🩸 एकजुटतेचे उदाहरण:
राजौरीचे काँग्रेस आमदार इफ्तखार अहमद यांनी जखमींना भेट दिली आणि स्वतः रक्तदान केले. त्यांनी नागरिकांना पुढे येऊन रक्तदानाचे आवाहन केले.
🛑 शाळा बंद:
जम्मूच्या सीमावर्ती ५ जिल्ह्यांतील सर्व शाळा व शैक्षणिक संस्था तात्काळ बंद करण्यात आल्या आहेत.
🏚️ स्थलांतर व मदत:
पुंछ प्रशासनाने ९ सार्वजनिक आश्रयगृहांची स्थापना केली आहे. जोरियन, आर.एस.पुरा, मेंढर परिसरात नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सुरू आहे.
JAMMU: Seven persons, including a woman and two children, were killed and 38 others injured Wednesday as Pakistan Army pounded dozens of forward villages with artillery and mortar shelling along the Line of Control (LoC) in Jammu and Kashmir, officials said.
Read more at:… pic.twitter.com/S5Lafi82F6
— JAMMU LINKS NEWS (@JAMMULINKS) May 7, 2025
[…] […]
[…] अफवा न पसरवण्याचं आवाहन केलं आहे. जम्मू काश्मीर पोलिस महासंचालकांनी देखील लोकांना […]