मविप्र मध्ये “परिवर्तन’ : ठाकरे पर्वाची सुरुवात

"परिवर्तना"चा गड आला ...पण सिंह गेला

0

नाशिक,३०ऑगस्ट २०२२ – अवघ्या उत्तर महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा विद्या प्रसारक शिक्षण (मविप्र) संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत तब्‍बल २० वर्षांनंतर संस्‍थेत ‘परिवर्तन’ घडले आहे .सरचिटणीसपदी ‘परिवर्तन’चे उमेदवार ॲड. नितीन ठाकरे यांनी नीलिमाताई पवार यांचा पराभव केला. परिवर्तन पॅनलच्‍या सर्व उमेदवारांनी आघाडी घेतलेली असताना, अध्यक्षपद वगळता परिवर्तन पॅनलने इतर सर्व जागांवर निर्विवाद विजय संपादित केला आहे.अध्यक्षपदाचे उमेदवार आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांना पराभवाचा धक्‍का बसला.”परिवर्तना”चा गड आला …पण सिंह गेला. २१ पैकी तब्बल २० जागांवर परिवर्तन पॅनलने विजयी मिळवला.प्रगती पॅनलचे डॉ. सुनील ढिकले अध्यक्षपदी विजयी झाले.

निवडणूक जाहीर झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधी गटांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. यंदाच्या निवडणुकीत निलीमाताई पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनल तर अॅड. नितीन ठाकरे प्रणित परिवर्तन पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली. २१ पैकी तब्बल २० जागांवर परिवर्तन पॅनलने विजयी झेंडा फडकवला. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. शेवटी बारा वाजेच्या सुमारास अखेरचा निकाल हाती आला. परिवर्तन पॅनलने मविप्र संस्थेवर एक हाती सत्ता मिळवली आहे. डॉ. सुनील उत्तमराव ढिकले यांच्या रूपाने प्रगती पॅनलचा एकमेव उमेदवार विजयी झाले .विरोधी परिवर्तन पॅनलने सत्तेतल्या प्रगती पॅनलला धूळ चारत विजयाची गुढी उभारली आहे.या विजयासोबतच तब्बल 25 वर्षानंतर मविप्र संस्थेतपरिवर्तन घडले आहे. सोमवारी मध्यरात्री अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.

२००२ मध्ये (स्‍व.) डॉ. वसंतराव पवार यांनी निवडणूक जिंकत मविप्रचे नेतृत्‍व हाती घेतली. त्‍यानंतर २००७ च्‍या निवडणुकीतही त्‍यांनी यश मिळविले. मात्र त्‍यांच्‍या अकाली निधनानंतर श्रीमती पवार यांच्‍याकडे सरचिटणीसपदाची धुरा समाजाने सोपविली होती. पुढे २०१२ मध्ये त्‍यांनी निवडणूक जिंकत सरचिटणीसपद आपल्‍याकडे कायम राखले. २०१७ च्‍या निवडणुकीतही प्रगती पॅनलने श्रीमती पवार यांच्‍या नेतृत्‍वाखाली एकहाती सत्ता मिळविली होती.संस्‍थेत ॲड. नितीन ठाकरे यांनी सभापती म्‍हणून नेतृत्‍व केले आहे. मागील निवडणुकीत पराभवाचा धक्‍का बसल्‍यापासून त्‍यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली होती. ॲड. कोकाटे, बाळासाहेब क्षीरसागर, डी. बी. मोगल, डॉ. सयाजीराव गायकवाड यांच्‍यासह इतरांची मोट बांधत अखेर ॲड. ठाकरे यांनी संस्‍थेवर विजयी पताका फडकविली.

अंतिम निवडणूक निकाल असा :
अध्यक्षपदाचे प्रगती पॅनलचे उमेदवार डॉ. सुनील ढिकले (४,९३७) विजयी झाले तर परिवर्तन पॅनलचे आमदार माणिकराव कोकाटे (४,६२८) यांना पराभवाचा धक्का बसला. उर्वरीत सर्व जागांवर परिवर्तनचे उमेदवार विजयी झाले. सरचिटणीस- ॲड. नितीन ठाकरे (५,३९६), नीलिमाताई पवार (४,१३५), उपाध्यक्ष- दिलीपराव मोरे (४,४९४) विजयी तर विश्‍वास मोरे (४,९६८), सभापती- बाळासाहेब क्षीरसागर (५,२२५), माणिकराव बोरस्‍ते (४,३४६), उपसभापती- डी. बी. मोगल (५,०४२), डॉ. विलास बच्‍छाव (४,३७१), चिटणीस- दिलीप दळवी (५,१४६), डॉ. प्रशांत पाटील (४,४११). महिला राखीव गटातून परिवर्तन पॅनलच्या दोन्ही महिला विजयी झाल्या.

तालुका संचालकपदी विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी, इगतपुरी- संदीप गुळवे (५,२६२), भाऊसाहेब खताळे (४,२६१), कळवण- रवींद्र देवरे (५,१२६), धनंजय पवार (४,४०५), चांदवड- डॉ. सयाजी गायकवाड (५,१३७), उत्तम बाबा भालेराव (४,४४१), दिंडोरी व पेठ- प्रवीण जाधव (५,४८५), सुरेश कळमकर (४,०७२), नाशिक शहर- लक्ष्मण लांडगे (५,०२३), नाना महाले (४,५३१), निफाड- शिवाजी गडाख (५,२५१), दत्ता गडाख (४,२७८), नांदगाव- अमित पाटील (५,०१८), चेतन पाटील (४,५५१), बागलाण- डॉ. प्रसाद सोनवणे (४,९७९), विशाल सोनवणे (४,५३५), मालेगाव- रमेश बच्‍छाव (५,०६६), डॉ. जयंत पवार (४,५२८), येवला- नंदकुमार बनकर (५,२६०), माणिकराव शिंदे (४,३३४), सिन्नर- कृष्णाजी भगत (५,१७९), हेमंत वाजे (४,२६१), देवळा- विजय पगार (४,८८५), केदा आहेर (४,६५२), नाशिक ग्रामीण- रमेश पिंगळे (४,९९५), सचिन पिंगळे (४,६०४).

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!