प्रवाशांना मिळणार अत्याधुनिक सुविधा:एसटीच्या ताफ्यात ‘ई-शिवाई ‘दाखल.,.!

0

किरण घायदार
नाशिक,दि.१६ नोव्हेंबर २०२४ –राज्य परिवहन महामंडळ सध्या वाहनखरेदीवर भर देत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर एसटीच्या ताफ्यात १२ मीटर लांबीच्या आणखी १०० ई-शिवाई गाड्या दाखल होणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, नाशिक विभागात तब्बल २० E शिवाई बसेसचे आगमन झाले आहेया बसेस नाशिक-पुणे या मार्गावर सध्या सुरु होणार आहेत.

सध्या मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या तुलनेत नव्या गाड्यांची आसनक्षमता अधिक आहे.त्यामुळे सणासुदीत प्रवाशांना आणखी बस मिळणार आहेत.एसटीने ५,१५० इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी १३८ मिडी ई-बसेस यापूर्वी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यातमुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई- शिवनेरीच्या ताफ्यात मागच्या आठवड्यात १७ नव्या बस दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत या मार्गावर ८३ गाड्या होत्या. नवीन बसगाड्यांच्या समावेशामुळे ई- शिवनेरीची संख्या आता १०० वर पोहोचली आहे. त्यामुळे दिवाळीत मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.

नागपूर-चंद्रपूर या मार्गावर, त्यानंतर नाशिक-बोरीवली तसेच नाशिक-छत्रपती संभाजीनगर या मार्गावर या बसेस सुरू केल्या जाणार आहेत. या गाड्यांचे तिकीटदर सध्या चलनात असलेल्या ई-शिवाई बसेसप्रमाणेच ठेवण्यात येणार आहे.

राज्यात १३७ बस दाखल

राज्याच्या विविध भागात आतापर्यंत १३७ ई- बस दाखल झालेल्या आहेत. १३७ पैकी ३८ शिवाई ई-बस छत्रपती संभाजीनगर विभागातील सिडको विभागाला मिळालेल्या आहेत. उर्वरित बस राज्यभरात विविध ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. अनेक विभागातील ई-चार्जिंग हब आगामी आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या परिवहन विभागच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक ई- बसमध्ये हायटेक सुविधा असल्या तरी त्याचे दर सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नाहीत. जालन्यासाठी १३०, बीडसाठी ३०० रुपये, पैठणला १३० रुपये असा दर आहे. तर लालपरीत हेच दर अनुक्रमे ९० व २०० असे आहेत. इच्छा असूनही सामान्यांना या बसमधून प्रवास करणे शक्य होत नसल्याने ते साध्या बसमधून प्रवास करत आहेत. ई बसची दरवाढ कमी केल्यास यातून आरामदायक प्रवास शक्य आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.