मुंबईत आढळला कोरोनाच्या XE व्हेरियंटचा रुग्ण 

0

मुंबई – मुंबईत कोरोनाचा XE व्हेरियंट आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मुंबईतून गुजरात मधील बडोद्याला प्रवास करणाऱ्या एका ६७ वर्षीय पुरुषांमध्ये XE  व्हेरियंट आढळला आहे. आज एन.सी.डी.सी. नवी दिल्ली यांनी स्पष्ट केले आहे. या रुग्णाला बडोद्यामध्ये १२ मार्च रोजी सौम्य ताप आल्याने त्याची कोविड तपासणी करण्यात आली. सध्या हा रुग्ण पूर्णपणे लक्षण विरहित आहे. या रुग्णाने कोविशील्ड लशीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्याच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.

विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये बदल होत राहणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून यामुळे सर्वसामान्य जनतेने घाबरून न जाता दक्षता घेण्याची गरज आहे.XE व्हेरियंटला घाबरण्याचे कारण नाही असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान केंद्र सरकारने पाच राज्यांना काळजी घेण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे.या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे.

मुंबईतील सांताक्रूझ येथील  रहिवाशी असलेला हा व्यक्ती  गुजरातमधील बडोदा येथे तो  गेला होता. बडोदा येथे रिपोर्ट जिनोमिक सिक्वेन्स करण्यात आले. त्यात XE चा व्हेरियंट आढळून आला. एक्स ई हा व्हेरीयंट बी ए. 1 आणि बी ए. 2 चे मिश्रण असून त्यामुळे विषाणू प्रसाराचा वेग वाढतो असे आतापर्यंतच्या माहिती वरून दिसते.दरम्यान भीतीचं कुठलेही कारण नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे देखील आरोग्य मंत्री या वेळी म्हणाले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.