पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आज रात्री ८ वाजता राष्ट्राला संबोधन

भारत-पाक संघर्षावर महत्त्वाचं विधान होण्याची शक्यता;जनस्थान ऑनलाईनच्या फेसबुक पेजवर थेट (Live) पाहता येणार

0

नवी दिल्ली, १२ मे २०२५ – PM Modi to Address the Nation पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर उसळलेल्या भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला संबोधित करणार आहेत. देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांच्या भाषणाची उत्सुकता लागली आहे.

ANI वृत्तसंस्थेनुसार, पंतप्रधान मोदी यांचं हे संबोधन अत्यंत महत्त्वाचं मानलं जात असून, यामध्ये ते पाकिस्तानवर आणि दहशतवाद्यांवरील भारतीय कारवाईवर भाष्य करणार आहेत, अशी शक्यता आहे.

भारताने ७ मे रोजी पहाटे पाकिस्तानातील दहशतवादी लष्करी तळांवर जोरदार कारवाई केली होती. भारतीय लष्कराच्या माहितीनुसार या कारवाईत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यानंतर ८ आणि ९ मे रोजी पाकिस्तानने ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न केला, मात्र भारतीय एअर डिफेन्स सिस्टमनं हे हल्ले यशस्वीपणे परतवून लावले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १० मे रोजी भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती कमी करण्यासाठी शस्त्रसंधीची घोषणा केली होती, ज्याला दोन्ही देशांनी मान्यता दिली.

ताज्या घडामोडींनुसार, रविवारी पहाटेपासून सीमेवर शांतता आहे. भारतीय सैन्य दलाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्तरित्या आपल्या तयारीबाबत माहिती दिली.

जनस्थान ऑनलाईनच्या फेसबुक पेजवर थेट (Live) पाहता येणार (PM Modi to Address the Nation)

आजच्या संबोधनात पंतप्रधान नरेंद्र मोदी शस्त्रसंधीवर, पाकिस्तानला दिलेल्या इशाऱ्यावर आणि आगामी धोरणांवर भाष्य करतील, अशी शक्यता आहे. हे भाषण जनस्थान ऑनलाईनच्या फेसबुक पेजवर थेट (Live) पाहता येणार आहे.

जनस्थान ऑनलाईन च्या या लिंक वर क्लीक करा

www.facebook.com/jansthan.nashik.7

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!