मुंबई,दि,३१ जुलै २०२४- वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यांचे उत्तर न मिळाल्याने त्यांना अखेर दोषी ठरवण्यात आलं आहे. UPSC ने पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आणि त्यांना भविष्यातील सर्व परीक्षा/निवडींमधून कायमचे काढून टाकण्यात आलं आहे.
पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससीने ही कारवाई केली आहे.पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससीने कारवाई केल्यानंतर आता पोलिस त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे.पूजा खेडकरांनी यूपीएससीमध्ये खोटं दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यूपीएससीने आता पूजा खेडकर यांचे पद काढून घेतलं असून त्यांना भविष्यात कोणतीही परीक्षा देता येणार नाही. नैसर्गिक न्याय तत्वानुसार त्यांची बाजू मांडण्यासाठी ३० जुलैपर्यंत वेळ देण्यात आलं होतं. त्यानंतर आता यूपीएससीने कारवाई केली.
पूजा खेडकर यांच्यासमोरील अडचणीत आता वाढ होणार असून दिल्ली पोलिस त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची शक्यता आहे.दिल्ली पोलिसांनी या याधीच पूजा खेडकर यांच्यावर खोटे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल केला होता.