नाशिक,दि,१ जानेवारी २०२५ –भारतीय कला आणि संस्कृती विरासत केंद्र,नवी दिल्ली आणि श्रीनृत्यांजली ग्लोबल आर्ट कल्चर नवी दिल्लीच्या वतीने श्रीक्षेत्र अयोध्या येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कला आणि सांस्कृतिक महोत्सव २०२४ मध्ये नाशिक (पिंपळगाव ) शहरातील केशव कथक नृत्यालयाची नृत्यांगना पूजा कुलकर्णी यांनी कथक नृत्य प्रकारात प्रथम पारितोषिक मिळविले तसेच येथील महोत्सवामध्ये त्यांना श्री राघव कला ऐश्वर्या सम्मान देऊन गौरविण्यात आले.
कथक नृत्य प्रस्तुती मध्ये तिने शिव वंदना ताल रुपक तसेच महाराज बिंदादिन रचित काहे रोखत डगर ही ठुमरी सादर केली. यावेळी फेस्टिवलचे आयोजक डॉ.सुमिता दत्ता रॉय यांनी पूजाच्या कलेचे कौतुक केले. पूजाच्या यशासाठी केशव कथक नृत्यालयाचे तिचे नृत्यगुरु श्री. रोहित जंजाळे यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले.