MRF सुपरक्रॉस स्पर्धेत टीवीएस पेट्रोनास टीमचा प्रज्वल विश्वनाथ विजयी 

0

नाशिक ( प्रतिनिधी ) अत्यंत अटीतटीच्या लढतील  एम आर एफ सुपरक्रॉस स्पर्धेत टीवीएस पेट्रोनास टीमचा प्रज्वल विश्वनाथ याने नाशिकच्या तिसऱ्या स्पर्धेत विजेतेपद पटकावून आपले नाव कोरले . नुकत्याच नाशिक मध्ये  झालेल्या एम आर एफ मोग्रीप एफ एम एस सी आय राष्ट्रीय सुपरक्रॉस विजेतेपद  स्पर्धेत नाशिककरांची डोळ्याची पारणे फेडली . एस एक्स १ या विदेशी बनावटीच्या मोटारसायकल साठीच्या गटात अटीतटीची लढत बघायला मिळाली असून टीव्हीएस रेसिंग टीमच्या स्पर्धकांचा सहभाग या गटातील रंगात वाढवणार ठरला .

सर्वोत्तम दुचाकी रायडर्स चे कसब यावेळी बघावयास मिळाले .यामध्ये विदेशी बनावटीच्या गाड्या तसेच देशी  गाड्यांचा सहभाग होता  .ही स्पर्धा एकूण नऊ गटात संपन्न झाली असून सुमारे ८० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता .या स्पर्धेचे  गॉड्स्पीड रेसिंग या संस्थेने केलेले असून शाम कोठारी , सुरज कुटे यांच्या अधिपत्याखाली  आयोजन करण्यात आलेले आहे .

सुपरक्रॉस हा कृत्रिमरित्या बनवलेल्या मार्गावर मोटारसायकल साठी घेण्यात येणारा स्पर्धा प्रकार असून या मार्गावर वाकदार वळणे व छोटे मोठे उंचवटे बनवलेले असतात . उंचवट्यावरून उंचच उंच उड्या मारत जाणारे स्पर्धक हा मोठा आकर्षणाचा भाग असतो . दिवसोंदिवस  या स्पर्धेला प्रेक्षकांच्या उपस्थितीत लक्षणीय वाढ दिसून येत आहे .या मार्गावर १२  जम्पस , १ टेबलटॉप , व १ कट टेबलटॉप होते . तुलनात्मक रित्या बराच वेगवान ट्रॅक बनविलेला असल्याने स्पर्धकांचे कसब  पणाला लागली होती . प्रेक्षकांना मात्र येथे नेत्रदीपक स्पर्धेचा थरार  बघायला मिळाला .

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे .  
क्लास १ एस एक्स २, ५०० सी सी पर्यंत :  प्रज्वल विश्वनाथ  प्रथम , ऋग्वेद बारगुजे द्वितीय , श्लोक घोरपडे तृतीय
क्लास २ एस एक्स २ , ५०० सी सी पर्यंत : श्लोक घोरपडे  प्रथम , प्रणव बी के द्वितीय ,जय जाधव  तृतीय
 क्लास ३ नोव्हाईस २६० सी सी पर्यंत :कारण कुमार एम प्रथम , शैलेश कुमार द्वितीय , सचिन डी तृतीय
 क्लास ४ लोकल  २६० सी सी पर्यंत : राजेश स्वामी प्रथम  , पुष्कर घोरपडे  द्वितीय  , पिणॆश ठक्कर  तृतीय
क्लास ५ इंडियन एक्सपर्ट २६० सी सी पर्यंत : इम्रान पाशा प्रथम , सचिन डी द्वितीय , करणकुमार एम तृतीय
क्लास ६ प्राव्हेट एक्स्पर्ट  २६० सी सी पर्यंत :पॊमीन व्ही आर प्रथम , एल्डहोसे बेंनी द्वितीय , पुष्कर घोरपडे तृतीय
 क्लास ७ जुनिअर एस एक्स २५० सी सी पर्यंत : श्लोक घोरपडे प्रथम ,  विल्मर व्हॅलेन्टिनो द्वितीय ,  जितेंद्र सांगावे   तृतीय
क्लास ८ जुनिअर एस एक्स १०० सी सी पर्यंत : भैरव सी प्रथम , सुजन जे द्वितीय , दर्शित चव्हाण  तृतीय
 डेमोंस्ट्रेशन क्लास : विस्मय राम  प्रथम ,रीड सय्यद द्वितीय .

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.