‘नावा प्रिमियर लिग (NPL)’ इंटर मिडीया क्रिकेट स्पर्धांची तयारी अंतिम टप्प्यात

०१ व ०२ एप्रिल रोजी स्पर्धांचे आयोजन  : स्पर्धेसाठी प्रिंट आणि इलेट्रॉनिक मिडियांच्या संघांची जोरदार तयारी सुरु 

0

नाशिक,दि. १५ मार्च २०२३ – नाशिक अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन (नावा) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘नावा प्रिमियर लिग (NPL)’ इंटर मिडीया क्रिकेट स्पर्धांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून त्यानुसार सामने जाहीर झाले आहेत. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक  सम्राट ग्रुप हे असून, येत्या ०१ व ०२ एप्रिल २०२३ रोजी  सकाळी ८.०० वाजेपासुन महात्मानगर क्रिकेट मैदानावर या स्पर्धा रंगणार आहेत.

केसिंग्टन क्लब येथे मंगळवारी लॉटस् पाडण्यात आले. यावेळी सामन्यांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले. स्पर्धेत एकूण १० संघांनी सहभाग घेतला आहे. २ ग्रुप करून साखळी सामन्याप्रमाणे ड्रॉ काढण्यात आले असुन ते  पुढील प्रमाणे अ-ग्रुप मध्ये १) टाईम्स ग्रुप २) पुण्यनगरी ३) दिव्य मराठी ४) लोकमत ५) सकाळ तसेच ब-ग्रुप मध्ये १) देशदुत २) लोकनामा ३) नावा ४) रेडीओ मित ५) पुढारी या साखळी सामन्यामध्ये प्रत्येक संघाचे ४ सामने होतील. अ-ग्रुपचे १० व ब-ग्रुपचे १० असे एकुन २० सामने रंगणार आहेत त्यापैकी दोन्ही ग्रुप मधील टॉप १ च्या संघामध्ये अंतिम सामना होईल.

या स्पर्धेसाठी सहप्रायोजक आयइवोक ऑप्टिकल अ‍ॅन्ड विजन केअर, युनिफार्म पार्टनर मधुरा ग्रुप, गिफ्ट पार्टनर सोनी गिफ्टस्, फुडस् पार्टनर एन. राका. अ‍ॅडव्हर्टायझींग, नवांकुर पब्लिसीटी व पिंगळे पब्लिसिटी, टॉफी पार्टनर मिडीया  अ‍ॅडव्हर्टायझींग, टॉस पार्टनर मयुर अलंकार, तसेच लिटमस अ‍ॅकेडमी, एखंडे अ‍ॅण्ड असोसिएट, गंगोत्री इस्टेट अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, श्री साक्षी अ‍ॅडव्हर्टायझींग, प्रतिबिंब आर्ट इफेक्ट यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांनी ग्राऊंड उपलब्ध करून दिले आहे. गेल्या १६ वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी नावाच्या वतीने क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत विजयी ठरणार्‍या संघाला नावा चषक प्रदान केला जातो. शिवाय उत्कृष्ट बॅटस्मन, उत्कृष्ट बॉलर, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज यांसारखी बक्षिसे दिली जातात. मिडिया जगतामध्ये या स्पर्धांविषयी विशेष औत्सुक्य असते. या स्पर्धेसाठी सर्व संघांची जोरदार तयारी चालू असून सर्व संघांचे विविध मैदानांवर सराव केला जात आहे. सदर स्पर्धेचे यु-ट्युब लाईव्ह करणार असुन या क्रिकेट स्पर्धामधे एलईडी स्टम्प राहणार आहेत.

Preparations for the 'Nava Premier League (NPL)' Inter Media Cricket Tournament are in the final stage

या स्पर्धाकरीता समिती प्रमुख रवि पवार,सचिन गिते व संस्थेचे अध्यक्ष प्रवीण चांडक, मोतीराम पिंगळे, दिलीप निकम, मिलींद कोल्हे पाटील, राजेश शेळके, गणेश नाफडे, दिपक जगताप, श्रीकांत नागरेे , अमोल कुलकर्णी, विठ्ठल राजोळे, शैलेश दगडे, शाम पवार, नितीन शेवाळे, तसेच वृत्तपत्र प्रतिनिधी लोकमतचे सोमेश चाटणकर, सकाळचे सुनिल पाटील, सोमनाथ शिंदे, टाईम्स ग्रुपचे, अभिजित गोरे, रूपेश शर्मा, बंटी पवार, पुढारीचे प्रल्हाद इंदोलीकर, बाळासाहेब वाजे, दिव्य मराठीचे इशहाक शेख, विजय क्षिरसागर, देशदुतचे अमोल घावरे,सचिन कापडणीस पुण्यनगरीचे अतुल पाटील, शिवराज आडके  लोकनामा व रेडीओ मित तर्फे दिपक जाधव, महेश अमृतकर, सतिश रकिबे, गौरव देवळे, आदी उपस्थित होते

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.