नाशिक,१८ सप्टेंबर २०२२-भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी आपले जीवन समर्पित करून आत्मनिर्भर भारत सारखे असंख्या उपक्रम राबवून भारताची प्रतिष्ठा जगाच्या कानाकोपऱ्यात अतिउच्च उंचीला नेवून पोहचविली असे प्रतिपादन आरोग्य आणि कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री ना.डॉ.भारती पवार यांनी केले. त्या आय.सी.ए.आय भवन येथे नरेंद्र मोदींजीच्या व्यक्तीमत्व, दुरदृष्टी व उपलब्धी या विषयावर सेवा पखवाडा निमित्ताने प्रज्ञावंताच्या मेळाव्यात बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर आ.देवयानी फरांदे, आ.सीमा हिरे, शहराध्यक्ष गिरीष पालवे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, सीए. पियुष चांडक, सीए. संजीवन तांबुळवाडीकर, सीए. सोईल शहा, ॲड.अविनाश भिडे, डॉ.विनोद विजन, डॉ.राजश्री पाटील, महेश दाबक, काशिनाथ शिलेदार, सुनिल बच्छाव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
त्या पुढे बोलतांना म्हणाल्याकी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे साध्यासाध्या गोष्टींचा बारकाईने विचार करून लाभार्थ्यांना न्याय कसा मिळून देता येईल यासाठी अहोरात्र कार्य करत असतात. कोविड व्हॅक्सिनेशनच्या कार्यक्रमातून २०० कोटी पेक्षा अधिक व्हॅक्सिनेशन करून जगभर भारताच्या नावाची चर्चा होत आहे. शासकिय कारभारांमध्ये डिजिटल व माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारी कामांमध्ये गतीमानता आणली असे त्या म्हणाल्या. ब्रेन पॉवर व मॅन पावर यांचा सुरेख संबंध साधून जगभरात भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावार आणून ठेवली. नजीकच्या काळात भारत नंबर एक अर्थव्यवस्था असेल. समृध्द व प्रगत भारताच्या उभारणीसाठी जनआंदोलनाच्या माध्यमातून विविध उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबवित आहे. सुद्रुड व निरोगी भारतासाठी आयुष्यमान भारत सारखे उपक्रम, २२ हून अधिक एम्स निमिर्ती, देशाच्या कानाकोपऱ्यात १५७ अधिक नवीन वैद्यकिय महाविद्यालयाची उभारणी आदी उपक्रम हाती घेण्यात आले आहे असे त्या शेवटी म्हणाल्या.
यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सीए. पियुष चांडक यांनी इन्स्टिटयुट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया च्या कार्याची माहिती देवून नाशिक जिल्हयात १८०० हून अधिक चार्टर्ड अकाउंटंट आपल्या सेवा पुरवित आहेत. केंद्रीय अर्थ खात्याच्या धोरणानुसार वेगवेगळया करांमध्ये होणाऱ्या कर प्रणलींची माहिती विविध चर्चा सत्रांव्दारे आय.सी.ए.आय च्या माध्यमातून उदयोग घटकांना, व्यापाऱ्यांना व लाभार्थ्यांना दिली जात असते असे ते म्हणाले.
यावेळी आ.देवयानी फरांदे, आ.सीमा हिरे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठ वर्षात जनहितासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रदेश उदयेाग आघाडीचे प्रदिप पेशकार, डॉ.प्रशांत पाटील, महेश हिरे, हिमगौरी आडके, दिपाली कुलकर्णी, डॉ.चंद्रशेखर नामपुरकर, लक्ष्मीकांत पारनेरकर, प्रा.कुणाल वाघ, डॉ.मंजुषा दराडे, मंदा फड, डॉ.निलम मुळे, सागर धर्माधिकारी, प्रफुल्ल संचेती, जितेंद्र चोरडीया, सुरेश कापडीया आदींनी चर्चा सत्रात भाग घेवून विविध समस्या मांडण्याचा प्रयत्न करून त्या सोडविण्यासाठी ना.डॉ.भारती पवार यांना निवेदन करण्यात आले.
यावेळी ॲड.अजिंक्य साने, चंद्रकांत खोडे, ॲड.शाम बडोदे, प्रा.शरद मोरे, भगवान दोंदे, छाया देवांग, डॉ.दिपाली कुलकर्णी, स्वाती भामरे, शाहीन मिर्झा, सुनिल खोडे, प्रज्ञा पाटील, ज्योती चव्हाणके, अविनाश पाटील, भास्कर घोडेकर, भगवान काकड, रवी पाटील, रोहिणी नायडू, वैशाली शहा, सुजाता जोशी, सुजाता करजगीकर, अर्चना दिंडोरकर, शिल्पा पारनेरकर, गोविंद बोरसे, ॲड.शाम घरोटे, सतिष कोठारी, प्रिती त्रिवेदी आदीसह १५० हून अधिक प्रज्ञावंत व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमात पाहुण्याचे स्वागत शहराध्यक्ष गिरीष पालवे यांनी केले, सुत्रसंचालन काशिनाथ शिलेदार तर आभारप्रदर्शन सीए. संजीवन तांबुळवाडीकर यांनी केले.