नाशिक,दि,१२ जानेवारी २०२४ –पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवी दिल्ली येथून वायू दलाच्या खास विमानाने ओझर विमानतळावर आगमन झाले.यावेळी राज्याचे प्रधान सचिव नितीन करीर, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी प्रधानमंत्री यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी हेलिकॉप्टरने निलीगिरी बाग येथे आगमन झाल्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री दादा भुसे,ना. गिरीश महाजन भाजपा चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,यांनी स्वागत केले यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त (नाशिक शहर) संदीप कर्णिक उपस्थित होते.
आज सकाळी १०;१५ च्या सुमारास त्यांचे ओझर विमानतळावर आगमन झाल्यानंतर विशेष हेलिकॉप्टरने त्याचे नाशिकच्या तपोवनात हेलिपॅडवर आगमन झाले. तपोवनातुन त्याच्या रोड शो ला सुरुवात झाली असून तेथून ते रामकुंडावर गोदावरीची पूजा करणार असून त्यानंतर काळाराम मंदिरात त्यांच्या हस्ते पूजा होणार आहे काळाराम मंदिरात जाणारे हे पहिलेच पंतप्रधान असतील त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उदघाटन होणार आहे.