स्टार प्रवाहच्या ‘या’ मालिकेतून प्रिया मराठे येणार भेटीला

0

मुंबई – अभिनेत्री प्रिया मराठेला आजवर आपण अनेक हिंदी-मराठी मालिकांमधून भेटत आलोय. तिने साकारलेल्या खलनायकी व्यक्तिररेखांची छाप आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. प्रिया मराठेला खलनायकी व्यक्तिरेखा साकारणं आव्हानात्मक वाटतं. प्रेक्षकांना ज्या व्यक्तिरेखांचा राग येतो त्या साकारताना एक अभिनेत्री म्हणून कस लागतो असं तिला वाटतं. तुझेत मी गीत गात आहे या मालिकेत ती मोनिका ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

या भूमिकेचं वेगळेपण सांगताना प्रिया म्हणाली, ‘स्टार प्रवाहसोबत मी याआधी जयोस्तुते आणि शतदा प्रेम करावे या मालिका केल्या आहेत. तुझेच मी गीत गात आहे मालिकेच्या निमित्ताने पुन्हा या लाडक्या वाहिनीसोबत जोडली जाणार आहे. ही म्युझिकल मालिका आहे. म्हणजे अशी कविता जी अनुभवायलाच हवी. या मालिकेतही हटके लूक मध्ये दिसेन. पिहू नावाच्या चिमुरडीसोबत माझे बरेचसे सीन आहेत. बालकलाकारांसोबत काम करताना नेहमीच मजा येते. त्यांच्या कलाने आणि त्यांचे मूड सांभाळत काम करावं लागतं. आताची पीढी प्रचंड हुशार आहे.

मालिकेतली चिमुकली स्वरा आणि पिहू दोघीही कमाल आहेत. आमची एकमेकांशी छान गट्टी जमली आहे. ही गोष्ट मुलगी आणि तिच्या बाबांच्या प्रेमावर आधारलेली आहे. बाप-लेकीच्या नात्यात माझी म्हणजेच मोनिका या पात्राची नेमकी काय भूमिका असेल हे पहायचं असेल तर २ मे पासून रात्री ९ वाजता तुझेच मी गीत गात आहे स्टार प्रवाहवर.’

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!