प्रियांका गांधी दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह 

0

नवी दिल्ली –काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधींना दोन महिन्यात दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी जूनमध्ये प्रियांका गांधी आणि सोनिया गांधींना कोरोनाची लागण झाली होती.कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रियांका गांधी यांनी स्वतः ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.

प्रियांका गांधींना यापूर्वी ३ जून रोजी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांची आई आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर प्रियांकानं ट्वीट करून सौम्य लक्षणं जाणवत असल्यानं कोरोना चाचणी केल्याची माहिती दिली होती. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मात्र, त्या होम आयसोलेशनमध्ये होत्या.

दुसऱ्यांदा प्रियांका गांधी यांना कोरोनाची लागण झाल्या नंतर त्यांनी ट्विट करून माहिती दिली त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलंय की, “आज कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली. होम आयसोलेशनमध्ये राहणार असून सर्व कोविड प्रोटोकॉलचे पालन करिन.”

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!